Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedएआयसी पिनॅकलकडून महिला उद्योजकांना सक्षम करण्‍यासाठी महिला-केंद्रित उपक्रम 'इव्‍हॉल्‍यूशनारी' लाँच

एआयसी पिनॅकलकडून महिला उद्योजकांना सक्षम करण्‍यासाठी महिला-केंद्रित उपक्रम ‘इव्‍हॉल्‍यूशनारी’ लाँच

पुणे, ऑगस्‍ट २२, २०२४: – एआयसी-पिनॅकल आंत्रेप्रीन्‍युअरशीप फोरम या अटल इनोव्‍हेशन मिशन (एआयएम) – नीति आयोग, भारत सरकारचे पाठबळ असलेल्‍या आघाडीच्‍या इन्‍क्‍यूबेटरला इव्‍हॉल्‍यूशनारी विमेन आंत्रेप्रीन्‍युअर्स प्रोग्राम लाँच करण्‍याचा आनंद होत आहे. हा नवीन उपक्रम महिलांमधील उद्योजकता उत्‍साहाला सक्षम व निपुण करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे.

 

२०२३ मध्‍ये पिनॅकल इंडस्‍ट्रीजने लाँच केलेला उपक्रम इव्‍हॉल्‍यूशनारी लैंगिक विविधतेला चालना देण्‍यासोबत सर्वसमावेशक कामाच्‍या ठिकाणाला गती देण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिला आहे. या बहुआयामी उपक्रमाचा महिलांना त्‍यांच्‍या करिअर प्रवासाच्‍या प्रत्‍येक टप्‍प्‍यावर पाठिंबा देण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यासाठी त्‍यांना कर्मचारीवर्गामध्‍ये पुन्‍हा प्रवेश करण्‍याची, नवीन व्‍यवसाय उद्यमांना एक्‍स्‍प्‍लोअर करण्‍याची आणि विविध क्षेत्रांमध्‍ये त्‍यांचे करिअर घडवण्‍याची संधी देत आहे.

 

इव्‍हॉल्‍यूशनारीच्‍या यश व सकारात्‍मक परिणामाला अधिक पुढे घेऊन जात एआयसी-पिनॅकलला फक्‍त महिला उद्योजकांसाठी त्‍यांच्‍या समर्पित उपक्रमाची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. इव्‍हॉल्‍यूशनारी विमेन आंत्रेप्रीन्‍युअर्स प्रोग्राम (डब्‍ल्‍यूईपी) ६-महिन्‍यांचा इन्‍क्‍यूबेशन उपक्रम आहे, जो महिला उद्योजकांना प्रेरित करण्‍यासोबत काळजीपूर्वक क्‍यूरेट केलेल्‍या १० महिला उद्योजकांच्‍या समूहामध्‍ये सामील होण्‍याची अद्वितीय संधी देत पाठिंबा देतो.

 

महिला उद्योजकांसाठी समर्पित जागा निर्माण करण्‍यासाठी एआयसी-पिनॅकल इव्‍हॉल्‍यूशनारी डब्‍ल्‍यूईपीच्‍या गतीला अधिक दृढ करण्‍याचा आणि महिला उद्योजकांच्‍या व्‍यापक समूहाला त्‍याचे फायदे देण्‍याचा प्रयत्‍न करतो. या उपक्रमामध्‍ये विविध विभाग आणि भौगोलिक क्षेत्रांमधील १०० हून अधिक मार्गदर्शक असतील. स्‍टार्टअपची गरज व आवश्‍यकतांनुसार मार्गदर्शकांचे वितरण करण्‍यात येते.

 

एआरएआयच्‍या माजी संचालक रश्‍मी उर्ध्‍वरेशे, रेलोफायचे सह-संस्‍थापक व सीटीओ ऋषभ सांघवी, अॅक्‍यूटास टेककॉमचे संचालक डॉ. रिज्‍वान पिंजारी हे काही मार्गदर्शक आहेत, जे महिला व्‍यवसाय प्रमुखांना त्‍यांच्‍या उद्योजकता प्रवासामध्‍ये मार्गदर्शन करतील.

 

एआयसी-पिनॅकलमध्‍ये ३ महिला-केंद्रित उद्यम – कृषीगती प्रा. लि., सेरेनम प्रॉडक्‍ट्स प्रा. लि. आणि मॉमी मिल्‍स फूड्स प्रा. लि. यांनी उल्‍लेखनीय क्षमता दाखवली आहे, तसेच इन्‍क्‍यूबेटरची संसाधने व तज्ञ मार्गदर्शनामधून मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे. या महिला-केंद्रित स्‍टार्टअप्‍सना सर्वसमावेशक पाठिंब्‍यासह मेन्‍टोरिंग, टेक्निकल असिस्‍टण्‍स, नेटवर्किंग संधी आणि मोठ्या प्रमाणात फंडिंग मिळाले आहे, ज्‍यामध्‍ये एमईआयटीवाय स्‍टार्टअप हब, अटल इनोव्‍हेशन मिशन आणि स्‍टार्टअप इंडिया सीड फंड (एसआयएसएफएस) यांच्‍या अनुदानांचा समावेश आहे.

 

”या उपक्रमाचा पोषक वातावरण तयार करण्‍याचा मनसुबा आहे, जेथे महिला प्रगती करू शकतात, नाविन्‍यता आणू शकतात आणि उद्योजक म्‍हणून नेतृत्‍व करू शकतात. आमच्‍या मागील कोहर्ट्ससाठी आम्‍हाला विविध विभागांमधील महिला उद्योजकांकडून अर्ज मिळत आहेत. महिला उद्योजकांचे प्रमाण वाढवण्‍यासाठी इन्‍क्‍यूबेटरने प्रथम अपरिहार्य व नाविन्‍यपूर्ण संकल्‍पना निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्‍हाला विश्‍वास आहे की महिला उद्योजकांनी अशा सर्वोत्तम संकल्‍पना सादर केल्‍या तर इन्‍क्‍यूबेशन मॅनेजर्स, अॅक्‍सेलरेशन मॅनेजर्स आणि मेन्‍टोर्सची आमची समर्पित टीम त्‍यांना व्‍यापारीकरणासह मदत करू शकते,” असे एआयसी-पिनॅकल आंत्रेप्रीन्‍युअरशीप फोरमचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. सुनिल धडीवाल म्‍हणाले.

 

इव्‍हॉल्‍युशनारी डब्‍ल्‍यूईपी सर्वसमावेशक सपोर्ट सिस्‍टम देईल, ज्‍यामध्‍ये मार्गदर्शन, नेटवर्किंग संधी आणि महिला उद्योजकांच्‍या गरजांनुसार डिझाइन केलेल्‍या संसाधनांचा समावेश असेल. अर्जदारांनी सादर केलेल्‍या संकल्‍पना व गरजांच्‍या आधारावर उपक्रमाचे फंडिंग निर्धारित करण्‍यात येईल, ज्‍यामधून प्रत्‍येक सहभागीला यशस्‍वी होण्‍यासोबत त्‍यांची ध्‍येये संपादित करण्‍यासाठी आवश्‍यक पाठिंबा मिळत असल्‍याची खात्री मिळेल.

 

विभाग केंद्रित – इव्‍हॉल्‍यूशनारी डब्‍ल्‍यूईपी विभाग-केंद्रित आहे, जे शक्‍यतो टेक आधारित सर्व विभागांसाठी खुले आहे.

 

पात्रता – १८ वर्षांवरील महिला उद्योजकांना अर्ज करण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. उद्योगासंबंधित अनुभवाची गरज नाही. उत्तम संकल्‍पना असलेले फ्रेशर्स देखील अर्ज करू शकतात.

 

कालावधी – ६ महिने (३ महिन्‍यांसाठी साप्‍ताहिक २ तासांचे व्‍हर्च्‍युअल सत्रे आयोजित करण्‍यात येतील).

 

अर्ज करण्‍याची पद्धत – कृपया https://forms.gle/TZTv4aGXT9AwtF8T9 येथे अर्ज संपूर्ण भरा किंवा +९१-९३०७३०५१८१ या क्रमांकावर संपर्क साधा.

 

लक्षात ठेवाव्‍यात अशा तारखा – अर्ज करण्‍याची अंतिम मुदत ३१ ऑगस्‍ट २०२४ आहे. सप्टेंबर २०२४ मध्‍यात निवडीची घोषणा करण्‍यात येईल. प्रोग्रामला ऑक्‍टोबर २०२४ पासून सुरूवात होईल.

 

२०१७ मध्‍ये स्‍थापना झाल्‍यापासून इन्‍क्‍यूबेटरने इलेक्ट्रिक वेईकल्‍स, अॅग्री-टेक, हेल्‍थ-टेक, आयटी, आयओटी, क्‍लीन एनर्जी, सोशल इनोव्‍हेशन अशा विविध क्षेत्रांमधील ८६ हून अधिक स्‍टार्टअप्‍सना पाठिंबा दिला आहे. अत्‍याधुनिक सुविधा, धोरणात्‍मक उद्योग सहयोग आणि १०० हून अधिक तज्ञांकडून मेन्‍टोरशीपचा समावेश असलेल्‍या प्रबळ इकोसिस्‍टमसह एआयसी-पिनॅकल आर्थिक साह्यासोबत अधिक सुविधा देते.

 

इन्‍क्‍यूबेटरचे विद्यमान प्रोग्राम्‍स जसे इमर्ज, इव्‍हॉल्‍व्‍ह आणि एलीव्‍हेट यांनी एकत्रित ३५ हून अधिक इंटेलेक्‍च्‍युअर प्रॉपर्टी राइट्स अर्ज निर्माण केले आहेत, तसेच २५० हून अधिक रोजगार निर्माण केले आहेत, ज्‍यामुळे भारतातील इनोव्‍हेशन इकोसिस्‍टमला मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे.

 

या परिवर्तनात्‍मक प्रोग्राममध्‍ये सामील होण्‍यास इच्‍छुक असलेल्‍या महिला उद्योजकांना अर्ज करण्‍याचे आणि या उपक्रमाचा भाग बनण्‍याचे आवाहन करण्‍यात येत आहे. या उकप्रमाचा व्‍यवसायामधील महिलांच्‍या भविष्‍याला नवीन आकार देण्‍याचा मनसुबा आहे.

 

आमच्‍यासह सामील व्‍हा, जेथे आम्‍ही अधिक सर्वसमावेशक व डायनॅमिक उद्योजकता इकोसिस्‍टमकरिता मार्ग मोकळा करत आहोत.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments