Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाल हक्क संरक्षण आयोगामार्फत बालगृहातील बालकांचा सत्कार

बाल हक्क संरक्षण आयोगामार्फत बालगृहातील बालकांचा सत्कार

पुणे, दि २३ : बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबई, महिला व बाल विकास विभाग तसेच होप फॉर द चिल्ड्रेन फाउंडेशन यांच्यामार्फत महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत बालगृहातील १० वी आणि १२ वी उत्तीर्ण झालेल्या बालकांचा सत्कार कार्यक्रम २८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षा बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा ॲड. श्रीमती सुशिबेन शहा तसेच प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात २५० बालकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

 

या अनाथ दुर्लक्षीत बालकांना प्रोत्साहन मिळण्याकरिता अधिकाधिक नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन आयोगामार्फत करण्यात आल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीमती मोनिका रंधवे यांनी कळविले आहे.

 

०००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments