Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे पीपल्स को-ऑप. बँकेस 'टॉप मोबाईल इनिशिएटीव्ह फॉर कन्झ्युमर्स' पुरस्कार* 

पुणे पीपल्स को-ऑप. बँकेस ‘टॉप मोबाईल इनिशिएटीव्ह फॉर कन्झ्युमर्स’ पुरस्कार* 

 

 

पुणे : पुणे पीपल्स को-ऑप. बँकेला आयकॉनीक लीडर्स या मान्यताप्राप्त संस्थेमार्फत सन २०२४ साठी ‘टॉप मोबाईल इनिशिएटीव्ह फॉर कन्झ्युमर्स’ पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. कर्जत येथे झालेल्या समारंभाचे सहप्रायोजक एनसीयुआय व नॅफकब या संस्थांनी केले होते. सहकार व बँकींग तसेच बँकींग टेक्नॉलॉजी क्षेत्रात उत्तम व दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकांना संस्थेमार्फत दरवर्षी पुरस्कृत करण्यात येते.

 

बँकेच्या वतीने सदर पुरस्कार अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे, जेष्ठ संचालक अॅड. सुभाष मोहिते, सुभाष गांधी, बिपीन शहा, संजीव असवले यांनी स्विकारला. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र.) संजय भोंडवे व आय टी. विभाग प्रमुख कैलास पवार उपस्थित होते.

 

पुणे पीपल्स को-ऑप बँक ही महाराष्ट्र राज्यातील मल्टीस्टेट को-ऑप. बँकांमधील एक अग्रगण्य बँक असुन ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेने एकूण व्यवसायाचा २३७८ कोटीचा टप्पा पार केला आहे. यामध्ये ठेवी रु. १४७१ कोटी, कर्जे रु. ९०८ कोटी चा समावेश आहे. बँकेची निव्वळ एन.पी.ए.ची टक्केवारी ०%, सी.डी. रेशो ६१.७०%, निव्वळ नफा रु.१६.२० कोटी असल्याची त्याचबरोबर बैंक सभासदांना सातत्याने १२% दराने लाभांश देत असुन या वर्षीही १२.५०% दराने लाभांश देणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सीए जनार्दन रणदिवे यांनी दिली.

 

सुरक्षा, पारदर्शी व्यवहार आणि ग्राहकहित ही बँकेची त्रिसूत्री असुरन २१ शाखा व एका विस्तारीत कक्षासह बैंक गेली ७२ वर्षांपासुन यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. आज बँकेकडे यूपीआय, आयएमपीएस, मोबाईल बँकिंग अँप, रूपे एटीएम, क्यूआर कोड, एनएसीएच अशा आधुनिक सुविधा कार्यान्वीत आहेत.

 

रिझर्व्ह बँकेने नुकतीच बँकेला बारामती व वाळूज (सभाजीनगर) येथे शाखा उघडण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असुन लवकरच सदर शाखा दिमाखात कार्यरत होतील याशिवाय युपीआय लाईट, रूपे चे कॉन्टॅक्टलेस एटीएम कार्ड, डाटा सिक्युरीटीसाठी क्लाऊडबेस प्रणालीचा वापर, स्वतंत्र आय एफ एस सी कोड व बेट सभासदत्व प्राप्त करणे, राज्यातील इतर जिल्हयात शाखा विस्तार करणे, इंटरनेट बैंकिंग सुरु करणे, शेडयुल्ड बँकेचा दर्जा प्राप्त करणे आदी उद्दिष्टे असल्याचे जेष्ठ संचालक अॅड. सुभाष मोहिते यांनी नमूद केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments