Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedयंदे मेडिकल फाउंडेशन व स्पेशालिटी डे केअर सेंटर तर्फे कान नाक घसा...

यंदे मेडिकल फाउंडेशन व स्पेशालिटी डे केअर सेंटर तर्फे कान नाक घसा – डोळे – दात तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे, २६ऑगस्ट २०२४ : यंदे मेडिकल फाउंडेशन व स्पेशालिटी डे केअर सेंटर तर्फे गणेशोत्सवानिमित्त दत्तात्रय जयराम यंदे स्मृती कान,नाक, घसा – डोळे – दात तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ.यंदे स्पेशालिटी डे केअर सेंटर, हॅपी कॉलनी, लेन ३, कोथरूड , पुणे येथे १९ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२४ दरम्यान सोमवार ते शनिवार दुपारी १२.३० ते ३.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये सहभागी होण्याकरिता नोंदणी आवश्यक असून याकरिता ९०११०३६२८९ / ९७६३७९१७९८ या क्रमांकावर संपर्क साधावा. सवलतीच्या दरात सल्ला , दुर्बिणीतून तपासणी, दातांचे एक्स-रे केले जातील व उपचारांवर देखील सवलत आहे !

 

आपल्या समाजात अनेक रुग्ण ऐकु कमी येणे , कानातुन पु-पाणी येणे व घोरण्या कडे दुर्लक्ष करत राहतात … हया रुग्णांसाठी शिबिरात विशेष प्राधान्य दिले जाणार आहे ! त्यांच्या साठी ऐकू येण्याची तपासणी व घोरण्याच्या समस्या असणाऱ्यांसाठी स्लीप स्टडी सवलतीच्या दरात केली जाणार आहे व मोफत श्रवणयंत्र चाचणी दिली जाणार असून, श्रवण यंत्रावर किमान ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments