Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedव्हॉट्सॲप तर्फे फास्‍ट लेन टू सोशल इम्‍पॅक्‍ट अहवाल सादर

व्हॉट्सॲप तर्फे फास्‍ट लेन टू सोशल इम्‍पॅक्‍ट अहवाल सादर

नवी दिल्‍ली, ऑगस्‍ट २7, २०२४ । व्हॉट्सॲपने आज आपला इम्‍पॅक्‍ट अहवाल ‘फास्‍ट लेन टू सोशल इम्‍पॅक्‍ट’ जारी केला, ज्‍यामधून प्‍लॅटफॉर्म भारतीय वापरकर्त्‍यांच्‍या जीवनात बजावत असलेली महत्त्‍वपूर्ण भूमिका दिसून येते. तसेच प्‍लॅटफॉर्म लघु व्‍यवसायांना आजच्‍या डिजिटल अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये प्रगती करण्‍यास सक्षम करत आहे आणि सामाजिक कल्‍याण संस्‍थांना सकारात्‍मक सामाजिक परिवर्तनाला चालना देण्‍यास प्रबळ करत आहे.

 

रेडसीर स्‍ट्रॅटेजी कन्‍सल्‍टण्‍ट्सने तयार केलेला अहवाल प्‍लॅटफॉर्मच्‍या ऑफरिंग्‍ज – व्हॉट्सॲप कंझ्युमर ॲप , व्हॉट्सॲप बिझनेस ॲप आणि व्हॉट्सॲप बिझनेस प्‍लॅटफॉर्म (एपीआय) यांच्‍या बहुआयामी प्रभावाला प्रकाशझोतात आणतो. या अहवालामधून व्‍यवसाय व समुदायांना सक्षम करण्‍यासाठी व्‍यक्‍तींमध्‍ये विनासायास संवादाची सुविधा देत व्‍यक्‍तींच्‍या परस्‍पर संवाद साधण्‍याच्‍या आणि व्‍यवसाय करण्‍याच्‍या पद्धतींवर प्‍लॅटफॉर्मने केलेला सकारात्‍मक प्रभाव निदर्शनास येतो.

 

लाँच करण्‍यात आलेल्‍या अहवालाबाबत मत व्‍यक्‍त करत मेटा इंडियाच्‍या पब्लिक पॉलिसीचे उपाध्‍यक्ष शिवनाथ ठुकराल म्‍हणाले, “ व्हॉट्सॲप महत्त्वपूर्ण टूल म्‍हणून उदयास आले आहे, जे व्‍यक्‍ती, व्‍यवसाय आणि सामाजिक कल्‍याण संस्‍थांच्‍या संवाद साधण्‍याच्‍या व कार्य करण्‍याच्‍या पद्धतींमध्‍ये क्रांतिकारी बदल घडवून आणत आहे. महिला उद्योजकांना पाठिंबा, बेरोजगारांना कौशल्‍य विकासाचे ज्ञान आणि पालक त्‍यांच्‍या मुलांच्‍या शिक्षणाशी संलग्‍न राहण्‍याची खात्री घेत संस्‍था सकारात्‍मक सामाजिक परिवर्तनाला चालना देण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्मच्‍या क्षमतांचा यशस्‍वीपणे अवलंब करत आहेत. अहवालामध्‍ये नमूद करण्‍यात आलेल्‍या केस स्‍टडीजमधून व्‍हॉट्सॲपची परिवर्तनात्‍मक क्षमता दिसून येते, जेथे ते समाजातील विविध विभागांना भारतातील झपाट्याने विकसित होत असलेल्‍या डिजिटल लँडस्‍केपमध्‍ये प्रगती करण्‍यास साह्य करत आहेत.”

 

भारतातील एमएसएमईंचे सक्षमीकरण आणि उद्योजकतेला चालना

 

व्हॉट्सॲप बिझनेस ॲपने भारतभरातील सूक्ष्‍म, लघु व्‍यवसायांना व सोलोप्रीन्‍युअर्सना नवीन बाजारपेठांचा शोध घेण्‍यासाठी आणि ग्राहकांना सेवा देण्‍यासाठी, तसेच त्‍यांच्‍या व्‍यवसायासाठी व्‍यावसायिक डिजिटल ओळख निर्माण करण्‍यासाठी लोकशाही गेटवे दिला आहे.

 

व्हॉट्सॲप बिझनेसने लघु व्‍यवसायांना कार्यसंचालन सुव्‍यवस्थित करण्‍यास आणि सहजपणे ऑनलाइन ऑर्डर्स मिळवत त्‍यांची पूर्तता करण्‍यास सक्षम केले आहे, तसेच त्‍यांना कार्यक्षमता वाढवण्‍यास आणि त्‍यांची पोहोच वाढवण्‍यास, आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठा उपलब्‍ध करून देण्‍यास मदत करत आहे. तसेच, स्‍थानिक व्‍यवसाय व स्‍टार्टअप्‍सना डिजिटल टूल्‍स उपलब्‍ध करून देत उद्योजकतेला चालना देत आहे, ज्‍यामुळे त्‍यांना मोठ्या उद्योगांप्रमाणे समान संधी मिळते. तसेच, कॉन्‍फडेरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) आणि मेटाच्‍या ‘ व्हॉट्सॲप से व्‍यापार’ प्रोग्रामचा व्हॉट्सॲप बिझनेस ॲपवर १० दशलक्ष स्‍थानिक व्‍यापाऱ्यांना डिजिटली प्रशिक्षित व अपस्किल करण्‍याचा मनसुबा आहे. भारतातील सर्व २९ राज्‍यांत ११ भारतीय भाषांमध्‍ये सहयोगाची अंमलबजावणी करण्‍यात येईल.हा सहयोग २५,००० व्‍यापाऱ्यांना मेटा स्‍मॉल बिझनेस अकॅडमी देखील उपलब्‍ध करून देतो, ज्‍यामधून मिळणारे प्रमाणन डिजिटल मार्केटिंग कौशल्‍यांमध्‍ये वाढ करते.

 

प्रभाव वाढवण्‍यासाठी सामाजिक कल्‍याण संस्‍थांचे सक्षमीकरण

 

व्हॉट्सॲपने भारतातील अनेक सामाजिक कल्‍याण संस्‍थांना शिक्षण, आरोग्‍यसेवा, आर्थिक समावेशन व महिला सक्षमीकरण अशा क्षेत्रांमध्‍ये प्रभावी सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यास सक्षम केले आहे, ज्‍यामुळे तळागाळापासून सकारात्‍मक सामाजिक बदल आणि परिवर्तनाला चालना मिळत आहे.मन देशी फाऊंडेशन आर्थिक साक्षरता आणि त्‍यांच्‍या व्हॉट्सॲप चॅटबोटच्‍या माध्‍यमातून बाजारपेठांमध्‍ये व्‍यवसाय संधी उपलब्‍ध करून देत १००,००० हून अधिक ग्रामीण महिला उद्योजकांना पाठिंबा देते. आतापर्यंत, त्‍यांनी १५,००० हून अधिक महिलांना डिजिटली प्रशिक्षण दिले आहे, ज्‍यापैकी ८५ टक्‍के महिला ग्रामीण लाभार्थी आहेत.इतर युज केसेस आहेत, ज्‍यामध्‍ये एनजीओ प्‍लॅटफॉर्मचा फायदा घेत पीरियड पोव्‍हर्टी कमी करणे, गरोदर महिलांचे सर्वसमावेशक आरोग्‍यसेवा व बेबी केअर ज्ञानासह सक्षमीकरण आणि उत्तम रोजगार संधींसाठी तरूण व्‍यावसायिकांना अपस्किल करणे अशा उपक्रमांमध्‍ये वाढ करत आहेत.

 

कार्यक्षम ई-गव्‍हर्नन्‍ससाठी नागरिक सेवांची निर्मिती

 

व्हॉट्सॲपने देशभरातील सरकारी एजन्‍सीजना कार्यक्षम आणि सर्वसमावेशक नागरिक सेवा वितरित करण्‍यासाठी पाठिंबा दिला आहे. अनेक नाविन्‍यपूर्ण व प्रभावी युज-केसेस आहेत, जसे तक्रार निवारण, डिजिटल आरोग्‍य तंत्रज्ञानाचा चालना देणे, सायबरसुरक्षा जागरूकतेचा प्रसार करणे, स्‍थानिक युटिलिटी सेवा देणे, कार्यक्षम व शाश्‍वत सार्वजनिक परिवहन सेवा देणे आणि इतर. उदाहरणार्थ, नॅशनल कंझ्युमर हेल्‍पलाइन (एनसीएच) विनासायास अनुभवाकरिता तक्रार व प्रश्‍नाचे निवारण करणाऱ्या सिस्‍टम्‍स सुव्‍यवस्थित करण्‍यासाठी व्हॉट्सॲपचा प्रभावीपणे वापर करत आहे. चॅटबोट भारतभरातील ग्राहकांना उत्‍पादन किंवा सेवांबाबत तक्रारी करण्‍यास सक्षम करते आणि तक्रार रेकॉर्ड्स उपलब्‍ध करून देते, ज्‍यामुळे अपडेट्सवर देखरेख ठेवता येते. ते जागरूकतेचा प्रसार देखील करते आणि ग्राहक अधिकारांबात नागरिकांच्‍या तक्रारी व इतर संबंधित शंकांचे निराक

रण करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments