Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंशोधनामुळे अभियांत्रिकी विकासाला गती - डॉ. सुनील भिरूड पीसीसीओई मधील आंतरराष्ट्रीय परिषदेचा...

संशोधनामुळे अभियांत्रिकी विकासाला गती – डॉ. सुनील भिरूड पीसीसीओई मधील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

पिंपरी, पुणे (दि २९ ऑगस्ट २०२४) प्रगतीचा ध्यास घेऊन माणूस नवनवीन प्रयोग, संशोधन करत आहे. त्यामुळे जगभरात विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर करून संशोधक नवे तंत्र विकसित करत आहेत. या संशोधनामुळे सार्वजनिक विकासाला गती मिळते. संशोधनामुळेच अभियांत्रिकी विकासाला गती मिळाली आहे असे मत सीओईपी तांत्रिक विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पीसीसीओई) येथे आठवी ‘आयसीसीयुबीईए – २४’ आणि तिसरी ‘आयमेस – २४’ या अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित दोन आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्या समारोप प्रसंगी डॉ. भिरूड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी आयईईईचे पुणे विभाग सचिव अभिजित खुरपे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक डॉ. नीळकंठ चोपडे, ‘आयसीसीयुबीईए – २४ प्रमुख डॉ. रोशनी राऊत, ‘आयमेस – २४’ प्रमुख डॉ. प्रवीण काळे आदी उपस्थित होते.

पहिल्या दिवशीच्या सत्रात आयसीसीयुबीईए परिषदेच्या प्लेनरी सेशनमध्ये कोलकता येथील डॉ. नीलांजन डे यांनी “द बिगर, द बेटर” या विषयावर आपले मनोगत सादर केले. आयआयटी मुंबईचे डॉ. भास्करण रमण यांनी “सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ” या विषयी फायदे तोटे सांगितले. डॉ. मंदार भाटवडेकर यांनी “पॉवर ऑफ डेटा स्टोरी टेलिंग” या विषयावर मार्गदर्शन केले. आयमेस प्लेनरी सेशनमध्ये कॅप जेमिनीचे संचालक गिरीश बोरा, आयआयटी धारवाडचे डॉ. जयथेजा एम “बिल्डिंग डीरिव्ड मटेरियल (बीडीएम) ॲस ए बॅकफिल मटेरियल” या विषयावर मार्गदर्शन केले.

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी कालिंदी संग्राजका आणि अँटोन वॉन (संस्थापक दावस्ट्रीट) यांनी “इव्होल्युशन ऑफ आयपी इन वेब -३” या विषयावर विचार मांडले. सहभागी संशोधक अर्जुन देवधर, कैवल्य गाडेकर, अतुल माकडे, अनिकेत दंडवते आणि मलेशिया येथून आलेल्या अमेलिया यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा, माहिती, मार्गदर्शन मिळाले, असे सांगितले.

डॉ. दिप्ती खुरगे यांनी परिषदेचा आढावा घेतला. आयसीसीयुबीईए परिषदेत १२६५ संशोधन लेख प्राप्त झाले. यापैकी २१७ लेख सादर करण्यात आले. तर आयमेस परिषदेत भारतासह परदेशातील ५० संशोधन लेख सादर केले. आभार डॉ. लक्ष्मण अवधानी यांनी मानले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते.

—————————————-

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments