Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedकुमार पॅसिफिक मॉल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील एकदिवसीय रॅपिड...

कुमार पॅसिफिक मॉल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत एकुण 160 खेळाडू सहभागी

पुणे, 30 ऑगस्ट, 2024: कुंटे चेस अकादमी आणि कुमार पॅसिफिक मॉल यांच्या सहकार्याने आयोजित कुमार पॅसिफिक मॉल व कुंटे चेस अकादमी पुरस्कृत विविध वयोगटातील एकदिवसीय रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत जिल्ह्यातून एकुण 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा कुमार पॅसिफिक मॉल, ग्राउंड फ्लोअर, सेव्हन लव्ह चौक, पुणे येथे रविवार, 1 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.

 

स्पर्धेच्या संचालिका मृणालिनी कुंटे यांनी सांगितले की, हि स्पर्धा पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल यांच्या मान्यतेखाली होत आहे. तसेच, हि स्पर्धा स्विस लीग पद्धतीने सात फेऱ्यांमध्ये खेळविण्यात येणार आहे. पुण्यात बुद्धिबळ खेळाचा प्रसार व्हावा याहेतूने कुमार पॅसिफिक मॉलने या स्पर्धेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

 

स्पर्धेत 160 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा चार गटात होणार असून यामध्ये अनिरुद्ध उदगीर (2013), अविरत चौहान (1907), युग बर्दिया (1707), निशांत जवळकर (1699), शिवम पेठकर (1619), विहान शाह (1612), शितिज प्रसाद (1592), अरिव कामथ (1529), अंकित सुहान (1476) यांचा समावेश आहे. हि स्पर्धा अ गटात (8 वर्षाखालील), ब गटात (10 वर्षाखालील), क गटात(12 वर्षाखालील) आणि ड गटात( 14 वर्षाखालील गट)अशा गटात ही स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत एकूण 40,000/-रुपयांची पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी नितिन शेणवी हे चीफ आरबीटर म्हणून काम पाहणार आहे

त.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments