Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी बँक आणत आहे ‘गिगा’ गिग कामगारांसाठी एक संपूर्ण आर्थिक उत्पादन-सेवा...

एचडीएफसी बँक आणत आहे ‘गिगा’ गिग कामगारांसाठी एक संपूर्ण आर्थिक उत्पादन-सेवा संच

मुंबई, ऑगस्ट , २०२४: एचडीएफसी बँक या भारतातील सर्वांत मोठ्या खासगी बँकेने आज गिगा हा खास गिग कामगार/फ्रीलान्सर्ससाठी डिझाइन करण्यात आलेला आर्थिक उत्पादने व सेवांचा संच संपूर्ण सर्वांपुढे आणला.

 

सुरुवातीला बँकेने फ्रीलासन्सर्सच्या गरजा समजून घेण्यासाठी एक सखोल ग्राहक अभ्यास केला, त्या अभ्यासाच्या आधारे फ्रीलान्सर्सच्या गरजांची पूर्तता करणाऱ्या कस्टमाइज्‍ड उत्पादन व सेवांचा गिगा हा डिजिटल-फर्स्ट प्रोग्रॅम विकसित करण्यात आला. गिग अर्थव्यवस्थेचा आता चांगलाच विस्तार झाला असून, यात व्यवस्थापन सल्लागार, सॉफ्टवेअर प्रोग्रामर्स व डिझायनर्स, आर्किटेक्ट्स, गुंतवणूक सल्लागार अशा पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या व्यावसायिकांचाही समावेश झाला आहे. त्याचबरोबर विशिष्ट व्यावसायिक/तांत्रिक कौशल्य असलेल्या कुशल कामगारांपासून ते कष्टकरी वर्गापर्यंत आणि डिलिव्हरी पार्टनर्स व रुग्णाची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश होतो.

 

एचडीएफसी बँकेच्या गिग बँकिंग, स्टार्ट-अप्स तसेच सरकारी व संस्थात्मक व्यवसाय विभागाच्या प्रमुख श्रीमती सुनाली रोहरा म्हणाल्या, “विविध क्षेत्रांतील फ्रीलान्स व्यावसायिकांच्या वेगवेगळ्या गरजांची पूर्तता करणाऱ्या आर्थिक उत्पादनांचा सर्वसमावेशक संच सर्वांपुढे आणताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या उत्पादनांमध्ये विशेषीकृत बचत खाती, चालू खाती, डेबिट कार्डस्, विशेष ऑफर्ससह क्रेडिट कार्डस्, अगदी दिवसाला २० रुपये एवढ्या कमी दरात आरोग्यविमा तसेच लवचिक गुंतवणूक उत्पादनांचा समावेश होतो. यामध्ये पारंपरिक एसआयपीऐवजी ते ‘जेव्हा करू शकतील तितकी आणि जितकी करू शकतील तितकी गुंतवणूक’ करू शकतात. त्याचप्रमाणे कस्टमाइझ करण्याजोग्या रिटेल असेट उत्पादनांचाही यात समावेश होतो. उत्पन्न आणि स्वातंत्र्य या दोन बाबींमुळे लोक अशा प्रकारची जीवनशैली स्वीकारत आहेत, डिजिटल परिसंस्थेच्या वाढीमुळे तसेच बहुतांशी कोठूनही काम करण्याची मुभा मिळाल्यामुळे अशा प्रकारच्या कामांना अर्थातच चालना मिळत आहे.”

 

भारतात ३० ते ५० दशलक्ष (३ ते ५ कोटी) गिग कर्मचारी असावेत असा अंदाज आहे आणि या क्षेत्रांची झपाट्याने वाढच होत

आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments