*निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी पूर्ण करुन प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे*
*-अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी*
*ठाणे दि.04 (जिमाका) :* आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024 च्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या प्रमुख उपस्थितीत समिती सभागृहामध्ये आज संपन्न झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीम.मनिषा जायभाये-धुळे, जलजीवन अभियान अतिरिक्त अभियान संचालक सुषमा सातपुते, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम संजय जाधव, नवी मुंबई उपजिल्हाधिकारी आंतराष्ट्रीय प्रभावित क्षेत्राच्या (नैना प्रकल्प) श्रीम.सुकेशिनी कांबळे-पगारे, अपर जिल्हाधिकारी मुख्य भूमी व भूमापन अधिकारी दिपक क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी संदिप माने, ट्रान्सपोर्ट इंजिनिअर महेंद्रकुमार मेटकरी, सुनिल महाले, जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे, भिवंडी निजामपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, नवी मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त शरद भगवान पवार, तहसिलदार (सामान्य) संजय भोसले, ठाणे महानगरपालिकेचे परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त भालचंद्र बेहेरे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी नरेंद्र भामरे, ठाणे महानगरपालिका मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिलीप सूर्यवंशी, जिल्हा परिषदचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारण उपजिल्हाधिकारी विकास पाटील, ठाणे शहर सह जिल्हा निबंधक वर्ग-1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी नारायण रजपूत, जिल्हा माहिती अधिकारी तथा प्रसारमाध्यम नोडल अधिकारी मनोज शिवाजी सानप, समाज कल्याणचे सहायक आयुक्त समाधान इंगळे, तहसिलदार उमेश पाटील, जिल्हा उपनिबंधक किशोर मांडे, जिल्हा परिषद महिला व बालविकास जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, कार्यकारी अभियंता सुनिल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे व इतर सहायक नोडल अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.कुलकर्णी म्हणाले की, प्रत्येकाने निवडणुकीच्या अनुषंगाने आपली तयारी पूर्ण करावी. जबाबदारीने काम करावे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व परिपत्रकांचा व्यवस्थित अभ्यास करुन सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. विधानसभा निवडणुकीच्या कामकाजाची आव्हाने अधिक असणार आहेत. अधिक काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे. परिस्थिती कोणतीही असली तरी आपली तयारी परिपूर्ण असावी. उपलब्ध मनुष्यबळाचा पूरेपूर व योग्य वापर करावा. सर्वांनी मिळून एकत्र काम करा आणि विधानसभा निवडणुकीचे कामकाज यशस्वीपणे पार पाडा, त्यासाठी सर्वांना शुभेच्छा, असेही ते म्हणाले.
बैठकीच्या सुरुवातीस जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांचे स्वागत करुन विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने केलेल्या तयारीविषयी माहिती दिली. त्यांनी श्री. कुलकर्णी यांना ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी -कर्मचाऱ्यांकडून लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही कामकाज जबाबदारीने उत्तमरित्या पार पाडले जाईल, या शब्दात आश्वासित केले.
बैठकीची प्रस्तावना व आभार प्रदर्शन उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वैशाली माने यांनी केले.
00000000000


