*ठाणे, दि.4(जिमाका) :-* सद्यस्थितीत समाजामध्ये वाढत असलेल्या बालकांवरील, महिलांवरील लैंगिक अत्याचार, शोषण या बाबींवर आळा घालणे तसेच त्यांना प्रतिबंध करणे, सर्वसामान्य जनतेमध्ये याबाबत जागृती करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्यातर्फे ठाणे जिल्ह्यातील नामांकित गणेशोत्सव मंडळाच्या सभा मंडपामध्ये या जाणीवजागृतीपर बालसुरक्षा, महिला सुरक्षा यांच्या बाबतचे भित्तीपत्रके लावण्यात येणार असून संपूर्ण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ५० मंडळे या उपक्रमात घेण्यात येणार आहेत.
तरी अशा प्रकारची जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन बिल्डींग, दुसरा मजला या कार्यालयात माहिती व प्रसिद्धीसाठी संपर्क साधावा. या कार्यालयातील संपर्क व्यक्ती म्हणून श्रीमती पल्लवी जाधव ९५२७१४८३१९, श्रीमती श्रद्धा नारकर – ९९२०१७२१५१, श्रीमती तेजस्विनी पाटील – ७५५८४८१९९५, श्रीमती कविता थोरात ९८३४२४५४३० यांना संपर्क साधावा.
हे साहित्य संपूर्णपणे विनामूल्य देण्यात येणार असून ते भित्तीपत्रके लावण्याची व ते संरक्षित ठेवण्याची जबाबदारी ही त्या स्थानिक मंडळाची असेल. अशा प्रकारे जाणीव जागृतीचे काम करणाऱ्या मंडळांना उत्कृष्ट गणेशोत्सव साजरा करणारे मंडळ म्हणून त्यांना जर पारितोषिक दिल्यास गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन मिळेल तसेच यामुळे समाजात अनैतिक प्रकारांना आळा घालण्यास मदत होईल, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी कळविले आहे.
0000000000


