Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedभव्य त्रिशूळ रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे...

भव्य त्रिशूळ रथातून मंडईच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक अखिल मंडई मंडळाचे गणेशोत्सवाचे १३१ वे वर्ष

पुणे: फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. शनिवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी १२ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरु डॉ. पराग काळकर आणि त्यांच्या पत्नी अंजली काळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

 

अखिल मंडई मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३१ वे वर्ष आहे. आगमन मिरवणूक मार्ग अखिल मंडई मंडळ – मंडई पोलीस चौकी, बाबू गेनू चौक, रामेश्वर चौक येथून पुन्हा बाबू गेनू चौक मार्गे उत्सव मंडप असा असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बॅन्ड पथक, स्वराज्य, सामर्थ्य हे ढोल पथक वादन करतील.

 

भव्य पुरातन शिवालयात विराजमान होणार मंडईचे शारदा गजानन- पाषाणात कोरलेल्या पुरातन शिवालयात अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन विराजमान होणार आहेत. मंडळाच्या वतीने यंदा ‘दगडांवर कोरलेल्या लेण्यांमधील महादेवाचे भव्य शिवालय’ ही सजावट करण्यात येणार आहे. यामध्ये महादेवाची भव्य पिंड व त्यावर सतत जलाभिषेक हे सजावटीचे विशेष आकर्षण असणार आहे.

 

शिवालयात १६ हत्ती, ६० लहान मोठ्या आकाराच्या घंटा, १५ मोठे त्रिशुळ, मंडपाच्या मध्यभागी १० फूटाचा नंदी, महादेव व पार्वतीचे भव्य चित्र असेल. कला दिग्दर्शक विशाल ताजणेकर व त्यांचे सहकारी गजेंद्र पांडे यांचे मार्गदर्शनाखाली ६० कुशल कारागीर १ महिन्यापासून शिवालय साकारण्याचे काम करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments