मुंबई, ऑगस्ट , २०२४: एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या मर्चंट अॅक्वायरिंग बँकेने एमएसएमईंसाठी साऊंडबॉक्स वैशिष्ट्यासह सुसज्ज पेमेंट डिवाईस ‘ऑल-इन-वन पीओएस’ लाँच केले आहे. हे डिवाईस देशभरातील व्यापाऱ्यांसाठी व्यवसाय कार्यसंचालनांमध्ये वाढ करेल.
ऑल-इन-वन पीओएस डिवाईस कॉम्पॅक्ट पेमेंट डिवाईस आहे, ज्यामध्ये पॉइण्ट-ऑफ-सेल (पीओएस), क्यूआर कोड स्कॅनर व साऊंडबॉक्सचा समावेश आहे, ज्यामुळे कॅशियर स्पेसमध्ये अव्यवस्था होत नाही. हे डिवाईस कार्ड डिप, टॅप अँड पे आणि क्यूआर स्कॅन अशा पेमेंटच्या प्रत्येक प्रकारच्या माध्यमातून सुलभपणे पेमेंट स्वीकृतीची सुविधा देते. हे डिवाईस पेमेंट्सचे त्वरित वॉईस नोटिफिकेशन देखील देते, ज्यामधून व्यापारी व ग्राहकांना पेमेंट व्यवहार पूर्ण झाल्याची खात्री मिळते. हे डिवाईस बँकेच्या स्मार्टहब व्यापार मर्चंट अॅपशी विनासायासपणे कनेक्ट होते, ज्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या बँक खात्याच्या स्टेटमेंट्सशी जुळवून घेण्यासाठी सर्व व्यवहारांचे सिंगल व्ह्यू मिळते.
हे डिवाईस डिजिटल पेमेंट्समधील भावी मोठी झेप दर्शवते, झपाट्याने वाढत असलेल्या कॅशलेस अर्थव्यवस्थेमध्ये व्यापाऱ्यांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करते. यूपीआय आणि कार्डस् ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी पेमेंटचे पसंतीचे माध्यम बनत असताना अनेक व्यवहारांचे व्यवस्थापन करणे आणि रिअल-टाइममध्ये पेमेंट्वर देखरेख ठेवणे व्यवसायांसाठी अधिक महत्त्वाचे बनले आहे. ऑल-इन-वन पीओएस डिवाईस आपल्या साऊंडबॉक्स वैशिष्ट्याच्या माध्यमातून त्वरित ऑडिओ कन्फर्मेशन्स देत या गरजेची पूर्तता करते.
ऑल-इन-वन पीओएसची ठळक वैशिष्ट्ये
· त्वरित पेमेंट अलर्टस्: प्रत्येक व्यवहारासाठी रिअल-टाइम ऑडिओ नोटिफिकेशन्स
· मल्टी-फॅक्शनॅलिटी: कार्ड पेमेंट्स, यूपीआय आणि डिजिटल वॉलेट्सना साह्य करते
· कॉम्पॅक्ट डिझाइन: जागा वाचवणारे व टिकाऊ, उच्च गर्दी असलेल्या भागांमध्ये उपयुक्त
· लँग्वेज सपोर्ट: विविध व्यापाऱ्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी विविध भाषांमध्ये उपलब्ध
· किफायतशीर: दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह किफायतशीर.
”एचडीएफसी बँकेमध्ये आम्ही नाविन्यतेला गती देण्याप्रती कटिबद्ध आहोत, जे व्यापाऱ्यांना सक्षम करते. ऑल-इन-वन पीओएस कार्यक्षम, विश्वसनीय आणि युजर-अनुकूल सोल्यूशन आहे. हे डिवाईस पेमेंट स्वीकृती व व्यवस्थापनामधील अडथळ्यांना मोठ्या प्रमाणात कमी करेल, ज्यामुळे व्यापाऱ्यांना त्यांच्या मुलभूत व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल,” असे एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ कार्यकारी उपाध्यक्ष रजनीश प्रभू म्हणाले.
या लाँचेससह एचडीएफसी बँक मूल्य-वर्धित सेवा देखील देते, जसे व्यापारी शोधक्षमता सुधारणे, सोशल मीडिया प्रोफाइल्स व डिजिटल स्टोअरफ्रण्ट्स तयार करणे, विनासायास पुरवठादार पेमेंट्स आणि व्यापारीफाय, इपेलॅटर व स्नॅपबिझ यांसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून सर्वोत्तम ग्राहक सहभागासाठी वैयक्तिकृत ऑफर्स तयार करण्याची आणि चालना देण्याची क्षमता.
बँक व्यापारी विभागाला साह्य करण्यासाठी नेटवर्क सहयोगी व्हिसासोबत देखील बारकाईने काम करते. व्हिसा आपल्या इकोसिस्टम भागीदारींसह लघु व मध्यम व्यापारी समुदायांना सक्षम करते, डिजिटल पेमेंट सोल्यूशन्स उपलब्ध करून देते, कमी-खर्चिक स्वीकृती सोल्यूशन्सना गती देते, विकासाला साह्य करते आणि व्यवसायांना त्यांच्या संपूर्ण क्षमता अनलॉक करण्यास मदत करते. व्हिसासोबतच्या या सहयोगाचा नवीन टचपॉइण्ट्सवर स्वीकृतीला गती देण्याचा आणि देशातील व्यापक व्यापारीवर्गामध्ये डिजिटायझेशन वाढवण्याचा मनसुबा आहे.
व्हिसा इंडिया व साऊथ एशियाच्या मर्चंट सेल्स अँड अॅक्वायरिंग (एमएसअँडए)चे उपाध्यक्ष व प्रमुख ऋषी छाब्रा म्हणाले, ”व्हिसाला एचडीएफसी बँकेसोबत सहयोग करण्याचा आणि ऑल-इन-वन पीओएससह लाखो व्यापाऱ्यांचे डिजिटायझेशन करण्याच्या आमच्या परस्पर प्रयत्नाचा अभिमान वाटतो. आमच्या सहयोगात्मक क्षमतेसह आम्हाला विश्वास आहे की, हे इनोव्हेशन्स भारतातील सर्व आकाराच्या उद्योगांच्या कार्ड प्रक्रिया व कॉन्टॅक्टलेस व्यवहार करण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणतील. तसेच व्हिसाप्रमाणे आम्ही डिजिटल पेमेंट्सचा अवलंब करण्यासाठी व्यापाऱ्यांकरिता किफायतशीर कार्यक्षम सोल्यूशन्स देत राहू.”
बँकेने स्वीकृती व्यवसायामधील आपले नेतृत्व स्थान कायम राखले आहे, तसेच ३० लाखांहून अधिक व्यापारी आस्थापनांना सेवा देत आहे.