पुणे, २० सप्टेंबर २०२४: टाटा मोटर्स ही भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी २३ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यामध्ये दिवसभर इव्हेण्ट ‘देश का ट्रक उत्सव’चे आयोजन करण्यास सज्ज आहे. हा इव्हेण्ट पुण्यातील ट्रकिंग समुदायाला टाटा मोटर्सच्या ट्रक्सच्या नवीन श्रेणीची कृतीशील माहिती व प्रत्यक्ष अनुभव आणि मूल्यवर्धित सेवांसह सक्षम करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे, ज्यामागे नफाक्षमता वाढवण्याचा आणि कमी टोटल कॉस्ट ऑफ ओनरशीप (टीसीओ) वितरित करण्याचा मनसुबा आहे.
इव्हेण्टदरम्यान, उपस्थितांना ताफ्याची कार्यक्षमता वाढवणे, इंधन कार्यक्षमता सुधारणे आणि मोठी नफाक्षमता संपादित करणे यासंदर्भात तज्ञांकडून मार्गदर्शन मिळेल. तसेच, त्यांना टाटा मोटर्सच्या सर्वसमावेशक विक्री-पश्चात्त सपोर्टमध्ये सविस्तर वेईकल प्रात्यक्षिके आणि माहितीचा फायदा देखील मिळेल. यामध्ये वेईकल मेन्टेनन्स प्रोग्राम्स, फ्लीट मॅनेजमेंट सोल्यूशन्स, वार्षिक मेन्टेनन्स पॅकेज आणि संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्या माध्यमातून २४/७ रोडसाइड असिस्टण्सचा समावेश आहे. संपूर्ण सेवा २.० उपक्रम ग्राहकांना त्यांच्या ताफ्यांसह दीर्घकाळापर्यंत यशस्वी ठरण्याकरिता सविस्तर माहिती देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. तसेच, कंपनी प्रमुख ग्राहकांचा सहयोग व पाठिंब्यासाठी सन्मान देखील करेल, ज्यामुळे एकूण अनुभव अधिक लाभदायी होईल.
टाटा मोटर्स कमर्शियल वेईकल्सच्या ट्रक्स विभागाचे अध्यक्ष व व्यवसाय प्रमुख श्री. राजेश कौल म्हणाले, “टाटा मोटर्स ग्राहकांच्या बदलत्या गरजांना समजून घेत त्यांची पूर्तता करण्याप्रती कटिबद्ध आहे. ‘देश का ट्रक उत्सव’ आम्हाला त्यांच्यासोबत प्रत्यक्ष संलग्न होण्यासाठी महत्त्वपूर्ण प्लॅटफॉर्म देतो, ज्यामुळे आम्हाला आमचे नवीन डिजिटल सोल्यूशन्स दाखवता येतात. हा इव्हेण्ट आम्हाला आमची प्रबळ ट्रक श्रेणी व मूल्यवर्धित सेवा दाखवण्यासोबत ग्राहकांची दीर्घकालीन लाभक्षमता व यशावरील त्यांच्या रिअल-वर्ल्ड प्रभावाला देखील दाखवण्यास सक्षम करतो. आमचे अत्याधुनिक सोल्यूशन्स ग्राहकांच्या व्यवसायांना भविष्यासाठी सुसज्ज करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत, ज्यामुळे ग्राहक विकसित होत असलेल्या लँडस्केपमध्ये अग्रस्थानी राहण्याची खात्री मिळते. आम्ही आमचा सहयोग अधिक दृढ करण्यासाठी आणि एकत्रित यश संपादित करण्यासाठी ग्राहक व सहयोगींसोबत परस्परसंवाद साधण्यास उत्सुक आहोत.”
टाटा मोटर्स ट्रक्सच्या व्यापक श्रेणीसह केबिन पर्याय देते, ज्यामध्ये एलपीटी, अल्ट्रा, सिग्ना आणि प्राइमा यांचा समावेश आहे. हे ट्रक्स फुली-बिल्ट बॉडी पर्यायांसह उपलब्ध आहेत, जे सामानांची वाहतूक, तसेच मार्केट लोड, कृषी, सिमेंट, लोखंड व स्टील, कंटेनर, पेट्रोलियम, केमिकल, वॉटर टँकर्स, एलपीजी, एफएमसीजी, बांधकाम, खाणकाम आणि महापालिका उपयोजनांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत. ही श्रेणी कार्यक्षम ताफा व्यवस्थापनासाठी टाटा मोटर्सचा कनेक्टेड वेईकल प्लॅटफॉर्म फ्लीट एजसह सुसज्ज आहे. टिकाऊपणासाठी प्रगत तंत्रज्ञानासह डिझाइन करण्यासोबत ग्राहकांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता करण्यासाठी बारकाईने चाचणी करण्यात आलेल्या या वेईकल्सना टाटा मोटर्सच्या व्यापक नेटवर्कचे पाठबळ आहे. देशभरात २५०० हून अधिक सेल्स व सर्विस टचपॉइण्ट्स आणि महाराष्ट्रात २५० टचपॉइण्ट्स असण्यासह कंपनी सर्वांगीण सपोर्ट आणि उच्च वेईकल अपटाइमची खात्री देते.


