Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी...

पिंपरी चिंचवड आय.टी.आय. येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २५ : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यमुना नगर, पिंपरी चिंचवड येथे २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना व शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिकाऊ उमेदवारी योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. देशपातळीवरील आय. टी.आय. उत्तीर्ण व इच्छुक उमेदवारांसाठी हा जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.

 

या मेळाव्यास आय.टी.आय. उत्तीर्ण उमेदवार, एमसीव्हीसी बायफोकल उत्तीर्ण झालेले प्रशिक्षणार्थी तसेच यापूर्वी उत्तीर्ण झालेले परंतु, शिकाऊ उमेदवारी न मिळालेले प्रशिक्षणार्थी व इतर १२ वी, पदविकाधारक, पदवीधारक व पदव्युत्तर अशा नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात उपस्थित रहावे, असे आवाहन औद्यागिक प्रशिक्षण संस्थेचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गडदरे तसेच प्राचार्य एस. डी. साबळे यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments