Saturday, November 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुस्तक परीक्षण       " झेप":  " कर्तृत्वाचा  दीपस्तंभ  "

पुस्तक परीक्षण       ” झेप”:  ” कर्तृत्वाचा  दीपस्तंभ  “

 

 

02 आक्टों. 2026 रोजी भूतान मध्ये प्रकाशित झालेले  “झेप “हे पुस्तक माध्यम कर्मी श्री देवेंद्र भुजबळ यांनी लेखन व संपादन केले आहे. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील छायाचित्रे पाहूनच मी प्रभावित झाले.आपलं जगणं तांत्रिक,भौतिक, आर्थिक प्रगतीकडे वेगाने धावत आहे तर दुसरीकडे पृथ्वीचे वाढते तापमान, हवामान बदल, निसर्गाचा लहरीपणा,कौटुंबिक, सामाजिक, जागतिक अशांतता,नात्यातला दुरावा,अस्थैर्य अशा विचित्र कात्रीत आपण चाचपडत आहोत. अशा विरोधाभासी परिस्थितीही अजिबात

विचलित न होता जिद्दीने अवकाशात झेप घेत  आणि इतरांना आशेचा,प्रकाशाचा किरण दाखविणाऱ्या या प्रेरक कथा ! अफाट सागरात विखुरलेल्या शिंपल्यातून नेमके, अचूक मोती वेचून त्याची सुंदर माळ बनवावी तसे समाजरुपी सागरातले उत्तुंग व्यक्तिमत्त्वांना वेचून अशा 36  महानुभावांच्या ” कर्तृत्वाचा दीपस्तंभ ” भुजबळ सरांनी आपल्यासमोर ठेवला आहे.

 

एकूण 11लेखकांनी मिळून ही माळ गुंफलेली आहे.ही सारी व्यक्तीमत्वं प्रतिकूल परिस्थितीतही जिद्दीने आपापल्या अवकाशात झेप घेत इतरांना मार्गदर्शक ठरली आहेत.सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रशासनात स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या 15 व्यक्तिमत्त्वांचा लेखाजोखा अतिशय समर्पक पध्दतीने

स्वतः भुजबळ सरांनी मांडला आहे.डाॅ.नरेशचंद्र काठोळे यांनी सुपर काम्प्युटरचे जनक डॉ. विजय भटकर ,जागतिक कीर्तीचे संशोधक असले तरी ” घार हिंडते आकाशी  ! ध्यान तिचे पिलापाशी  ! ” या उक्तीप्रमाणे आपला भवताल,गाव व देश समृध्द कसा होईल याचाच त्यांना सतत ध्यास…!

 

 

स्वाती वर्तक यांनी डॉ.रघुनाथ शेवगावकर यांच्या असामान्य, अद्भूत, अजोड व्यक्तिमत्वावर टाकलेला प्रकाश दिपवून टाकणारा आहे. इलेक्ट्रानिक्स इंजिनीअर

ते आयआयटीचे मुंबईचे प्रोफेसर, डायरेक्टर,पुणे विद्यापीठाचे कुलगुरू इतकी मोठी झेप घेत निवृत्तीनंतरही टाईम्स ऑफ इंडिया च्या बॅनेट विश्वविद्यालयाची निर्मिती असा मोठा पट थक्क करणारा आहे.

 

शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी असते.शासन

आणि जनता यातला दुवा म्हणजे प्रशासन..! भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्री विकास खारगे,अन्न व औषध प्रशासन विभागाचे

आयुक्त श्री तुकाराम मुंडे, विभागीय आयुक्त नयना गुंडे, जिल्हाधिकारी श्री दिलीप स्वामी  यांच्या कार्याची जनता सदैव दखल घेईल यात शंकाच नाही. एकीकडे बलाढ्य सत्ताधारी राजकारणी तर

दुसरीकडे सर्व सामान्य जनता यांच्यात योग्य समन्वय साधत प्रशासन लोकाभिमुख आणि पारदर्शी करण्याचे

कौशल्य अचंबित करणारे आहे.नियम व कायदे याला प्राधान्य देत चोख अन् खमकी भूमिका वठवित स्वतः ची एक अमीट छाप या अधिकाऱ्यांनी निर्माण केली आहे.

 

सुधाकर तोरणे आणि शरद चौधरी हे दोघेही अफलातून व्यक्तिमत्व…! महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक, वयाच्या 80 वर्षांनंतरही आठवड्याला एका पुस्तकाचे परीक्षण

करणे चालूच आहे.आराम हराम है याचे हे जीवंत उदाहरण म्हणजे सुधाकर तोरणे. शरद चौधरी हे देखील याच खात्यात छायाचित्रकार म्हणून कारकीर्द सुरू केली. पत्रकार, आकाशवाणी, पत्रकार प्रशिक्षण, पत्रकार संघटना, दैनिक भास्करचे संपादन असा मोठा पट गाठणारे व्यक्तिमत्त्व…!समाजाच्या विविध क्षेत्रात जीव ओतून काम करणाऱ्या या व्यक्ती पाहिल्या की,आपण ही प्रेरित होतो.

 

अण्णासाहेब टेकाळे, फेस्काॅमचे अध्यक्ष  ! जेष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करणारी ही संस्था..! शिस्तबध्द जीवन जगताना ज्येष्ठांना ही तशीच शिकवण देणारे अण्णासाहेब टेकाळे म्हणूनच खूप जवळचे वाटतात.

 

कृष्णा दिवटे पुस्तक प्रेमी व्यक्तिमत्व ! स्वतः बरोबर

त्यांनी आपल्या परिसरातल्या लोकांना पुस्तक वाचनाची सवय लावली.समाजात आजही बाई विधवा होताच अनिष्ट प्रथा परंपरांची ती बळी ठरते.त्या वाईट प्रथा कायद्याने बंद व्हाव्यात यासाठी व्यापक जन चळवळ उभे करणारे

प्रमोद झिंजाडे म्हणूनच वेगळे ठरतात. सुभाष खाकाळ सारखे आधुनिक सत्यवान आज ही आहेत हे स्वतः च्या कृतीतून सिद्ध करणारे ..! म्हणून वेगळे ठरतात. शून्यातून विश्व उभे करणारे उमाकांत रासने …! विक्रमवीर म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे विराग मधुमालती…!”  शिव तांडव स्तोत्रम् ” 01 मि. 33 सें.त पूर्ण करून विक्रम प्रस्थापित केला आहे.

 

क्रिप्टो करन्सी मध्ये स्वतः ची स्वतंत्र ओळख जगभर निर्माण करणारे अक्षय जाधव आज धोरणात्मक व्यवसाय सल्लागार ” म्हणून योगदान देत आहेत.

” उत्कृष्ठ अभियंता ” म्हणून भारत सरकारच्या विविध

प्रकल्पात नावलौकिक मिळविणारे अमोल मोहोळकर.हे सारेच दखल प्राप्त आहेत.

 

महिला देखील कुठे ही मागे नाही आहेत.त्या इथे संख्येने कमी असल्यातरी उल्लेखनीय आहेत. राधिका भांडारकर राष्ट्रीयकृत बँकेत नोकरी करीत असताना

लेखिका म्हणून कथा , कविता, लेखसंग्रह, आत्मवृत्त लिहित साहित्यिक क्षेत्रात स्वतः चे नाव कोरले आहे.

 

सुखदा प्रधान सिंग ! पिडित महिलांच्या पुनर्वसनासाठी वाहून घेत अनेक तरुणींना त्यांनी नरक यातनेतून बाहेर काढले आहे.एक तरुणी तर आयुर्वेदिक डॉक्टर झाली आहे. ,एक नर्सिंग कोर्स करुन सेवेचे व्रत इमानेइतबारे पार पाडते आहे. किती मोठी ही उपलब्धी…!

 

डॉ.मनिषा चाळसे संशोधनात स्वतः ला वाहून घेत आपल्या प्राॅडक्टला पेटंट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहे. शासकीय नोकरीत राहूनही स्वतः चे छंद जोपासता येऊ शकतात याचे ज्वलंत उदा. म्हणजे शोभा जोपुळे…! अश्विनी भोईर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व..! अनेक प्रथितयश महिलांच्या मुलाखती घेऊन नावलौकिक प्राप्त आहेत.ग्रंथाली प्रतिभांगणच्या कार्यक्रम समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.

माय मराठीचा वारसा जतन करण्यासाठी परदेशी जाऊन ही स्वस्थ न बसता उत्कृष्ठ कार्य करणारी पुनीता भडसावळे…! अमेरिकेत राहून मराठी मुलांसाठी मराठी शाळा सुरू करुन मराठी संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्याची तळमळ त्यांच्या

कार्यातून दिसून येते.

 

अलका भुजबळ न्यूज स्टोरी टुडे या वेब पोर्टलच्या निर्मात्या..! समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेऊन त्या समाजासमोर आणण्याचे मोठे कार्य त्या करीत आहेत. दुर्धर अशा कॅन्सर वर मोठ्या हिंमतीने झुंज देत त्यावर मात केली.कॅन्सर झाल्यानंतर खचून न जाता निकराने लढा दिला पाहिजे म्हणून ” काॅमा ” हे पुस्तक लिहून जनजागरण करीत आहेत.

 

राष्ट्र सेवा दलात जडणघडण झालेले सदानंद शेट्ये…! स्वतः गोदीत काम केल्याने कामगारांच्या प्रश्नांची जाण असल्याने ते संघटनेला वाहून घेतात.

 

डाॅ. विजय शिरीषकर गुरे राखत शिक्षण घेतात. डॉक्टर झाल्यानंतर स्वतःसाठी न जगता मुलांना दत्तक घेत त्यांचा शिक्षणाचा खर्च उचलणे,वृध्दांसाठी ” विजय शिरिषकर वृध्दाश्रम ” सुरु करुन ज्येष्ठांना दिलासा देत आहेत. ” हरित वीर ” म्हणून नावलौकिक असणारे पर्यावरण प्रेमी मारुती कदम..! वृक्ष लागवडीतून सानपाडा येथील  02,08,14,30 सेक्टर प्रदुषण मुक्त करण्यात यशस्वी ठरले आहेत.

 

भावेश भाटिया…!प्रेरणादायी व्यक्तिमत्व ..! दिव्यांगाना दया नको ,संधी हवी असते.दिव्यांग म्हणजे कमजोरी , त्याला भावेश यांनी सामर्थ्यीत रुपांतरित करीत सामाजिक क्रांती घडवून आणली.परिस्थिती भविष्य ठरवत नाही तर तुमची जिद्द भविष्य ठरविते.

 

सीबिजि या ऊर्जा प्रकल्पाचे शिल्पकार अनिल राजपिसे.. ! पर्यावरण पूरक,शाश्वत आणि स्वदेशी ऊर्जेचा मार्ग दाखवित केंद्र सरकारच्या हरित ऊर्जा क्रांतीचे स्वप्न वास्तवात आणण्यात मोठे योगदान…!एक प्रगतिशील शेतकरी कसा असावा हे यज्ञेश सावे यांनी आधुनिक शेतीचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. नंदकुमार पाटील सारखे ” जगन्मित्र ” ही मित्रांनी दिलेली पदवी स्वतः च्या हरहुन्नरी कलाकारीतून सिध्द केले आहे.

 

दिलीप पाथरे ….! उंच झेप घेणाऱ्या गरुडाला आकाश ठेंगणे असते.पोल्ट्री फार्मच्या व्यवसायातून स्वतः चा ठसा उमटवला आहे.” उद्योग रत्न ” या सन्मानाने ते गौरवांकित आहेत.                                                        एकूण 36  उल्लेखनीय अशा व्यक्तिमत्त्वांचा

वेध या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे.खरंतर ही एक तारेवरची कसरत असून योग्य न्याय

मला देता आलेला नाही,हे मी कबूल करते.ही सारी व्यक्तिचित्रण मुळातून वाचावीत अशी आहेत. प्रत्येकाच्या संग्रही अशी पुस्तकं असणं आवश्यक आहे.हे पुस्तक न्यूज स्टोरी टुडे पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे.सर्वांच्या

कार्याला हार्दिक शुभेच्छा…!!!

@ डॉ. प्रभा वाडकर, लातूर.

9869484800.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments