Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाझी वसुंधरा अभियान ४.० - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मिळविले आठ कोटी रू.चे...

माझी वसुंधरा अभियान ४.० – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने मिळविले आठ कोटी रू.चे प्रथम क्रमांकाचे बक्षिस

पिंपरी, दि. २७ सप्टेंबर २०२४ – पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित “माझी वसुंधरा अभियान” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक २ ऑक्टोबर, २०२० राबविण्यास सुरवात झाली. “माझी वसुंधरा अभियान ४.०” हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १ एप्रिल, २०२३ ते दिनांक ३१ मे, २०२४ या कालावधीत राबविण्यात आले होते. *माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये राज्यातील ४१४ नागरी स्थानिक संस्था व २२,२१८ ग्राम पंचायती अशा एकूण २२,६३२ स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता.

 

गटातील विजेते तसेच, महसूल विभाग व जिल्ह्याच्या एकूण कामगिरी वरून सर्वोत्तम विभागीय आयुक्त, सर्वोत्तम जिल्हाधिकारी व सर्वोत्तम मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांची शासनाच्या मान्यतेनंतर निवड करण्यात आली आहे. “माझी वसुंधरा अभियान ४.०” चा अंत्तीम निकाल खालील प्रमाणे जाहीर करण्यास शासनाने आज मान्यता दिली आहे.

 

गुणानुक्रमानुसार सर्वोत्तम ठरलेल्या १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राज्यस्तरीय अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगर पालिकेने प्रथम क्रमांक तर नवी मुंबई महानगर पालिकेने दुसरा तर ठाणे महानगर पालिकेने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

 

शासन मान्यतेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनिहाय बक्षिसांच्या रक्कमेचे वाटप शासन निर्णयानुसार सदर बक्षिसांसाठी येणारा एकूण खर्च रुपये २२४.५० कोटी (रूपये दोनशे चोवीस कोटी पन्नास लक्ष फक्त) एवढा असून, सदरचा खर्च सुरवातीस महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडील निधी मधून करण्यास येणार आहे. माझी वसुंधरा अभियानासाठी आवश्यक निधी अर्थसंकल्पीत झाल्यानंतर त्याची प्रतीपूर्ती महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळास करण्यात येणार आहे.

 

बक्षिसांच्या रकमेचा विनियोग व कार्यपध्दतीः-

 

(१) बक्षिस रकमेतून घ्यावयाच्या उपाय योजनाः सदर बक्षिस रक्कमेचा विनियोग हा निसर्गाच्या पंचतत्वांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठीच्या उपाय योजना हाती घेण्यासाठी करण्यात यावा. सदर उपाय योजनांपैकी काही उपाय योजना उदाहरणा दाखल खाली नमूद केल्या आहेतः-

 

१) शहराचे / गावाचे हरित अच्छादन वाढविण्यासाठी करावयाच्या उपाय योजना (जैवविविधतेच्या संवर्धनासह) उदा.:-

 

(अ) मियावाकी वृक्षारोपण

 

(ब) अमृत वन

 

(क) स्मृती वने

 

( ड) शहरी वने

 

(इ) सार्वजनिक उद्याने

 

२ ) जुन्या हरित क्षेत्रांचे संवर्धन आणि देखभाल (जैवविविधतेच्या संवर्धनासह)

 

३ ) रोप वाटीकांची निर्मिती

 

४) जलसंवर्धनाचे उपक्रम

 

५) रेन वॉटर हारवेस्टिंग व परकोलेशन

 

६) नदी, तळे व नाले यांचे पुनःजिविकरण

 

७ ) नूतनीकरणयोग्य उर्जा स्त्रोतांच्या वापरास प्रोत्साहन देण्याच्या उपाय योजना

 

८) सौरउर्जेवर चालणारे / एलईडी चालणारे दिवे

 

९) विद्युत वाहनांना प्रोत्साहन- चार्जिंग पॉईंट उपलब्ध करून देणे,

 

१०) माझी वसुंधरा अभियानांतर्गत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धाच्या विजेत्यांना बक्षिस देणे

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments