Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शुक्रवारी

निकमार विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ शुक्रवारी

 

 

पुणे: देशातील पहिली कंट्रक्शन मॅनेजमेंटमधील विद्यापीठ म्हणून ओळख असणारी निकमार विद्यापीठ पुणे यांचा पहिला दीक्षांत समारंभ शुक्रवार 04 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता आयोजित केला आहे. हा समारंभ मुख्य सभागृह, निकमार विद्यापीठ, पुणे येथे होणार आहे, ज्यामध्ये विविध विद्याशाखेतील 790 हून अधिक पदवीधर विद्यार्थी, 06 सुवर्णपदक विजेते त्यांच्या पदव्या स्वीकारणार असल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांनी दिली.

 

विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे म्हणाले की, निकमार विद्यापीठाच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आणि एचसीसी लिमिटेडचे प्रमुख श्री अजित गुलाबचंद हे प्रमुख पाहुणे असतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निकमार विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. अनिल कश्यप असतील तसेच या दीक्षांत समारंभाला कुलगुरू डॉ. सुषमा एस. कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

पहिल्या दीक्षांत समारंभातील सुवर्णपदक विजेत्यांमध्ये एमबीए अडव्हान्स कंस्ट्रक्शन मॅनजमेंटचा विद्यार्थी लक्ष्मणन, एमबीए – प्रगत प्रकल्प व्यवस्थापन, 2024चा विद्यार्थी पटगर रवींद्र नारायण, एमबीए – रिअल इस्टेट आणि अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट, 2024चा विद्यार्थी बोंडे कुणाल शांताराम, पीजीपी – प्रमाण सर्वेक्षण आणि करार व्यवस्थापन, 2024चा विद्यार्थी विपुल भालदे, पीजीपी – प्रमाण सर्वेक्षण आणि करार व्यवस्थापन, 2023 चा विद्यार्थी प्रजापती शिवप्रसाद बाराखुराम आणि पीजीपी – कुटुंबाच्या मालकीच्या बांधकाम व्यवसायाचे व्यवस्थापन, २०२३चा विद्यार्थी चोवट्या श्रेनिल विजयभाई यांचा समावेश आहे.

 

समारंभाची सुरुवात शैक्षणिक मिरवणुकीने होईल, त्यानंतर प्रमुख मान्यवरांची भाषणे आणि पदवी प्रदान करण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. आदिनाथ दामले आणि कुलसचिव डॉ. प्रशांत दवे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments