Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedसहकार भारती प्रकाशित, सहकार सुगंध निर्मित, "सहकार महर्षी" ग्रंथ प्रकाशन...*

सहकार भारती प्रकाशित, सहकार सुगंध निर्मित, “सहकार महर्षी” ग्रंथ प्रकाशन…*

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीत ज्यांनी आपले जीवन समर्पित केले अशा १७५ सहकार महर्षींच्या जीवन चरित्राची सचित्र माहिती असलेला ग्रंथ – सहकार महर्षी! या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन राजस्थानचे महामहीम राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते सहकार भारतीच्या शिर्डी येथील प्रदेश अधिवेशनात मोठ्या दिमाखात झाले. यावेळी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील प्रमुख अतिथी म्हणून व कोपरगावचे आमदार आशुतोष काळे उपस्थित होते तर व्यासपीठावर सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी, प्रदेश अध्यक्षा डॉ. शशिताई अहिरे, प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, चेतन लागू उपस्थित होते. तसेच स्व. अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्काराने सन्मानित आमदार प्रकाशअण्णा आवाडे उपस्थित होते.

सहकार महर्षी ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीला भरघोस प्रतिसाद मिळाला. या ग्रंथाला महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार मिळाला आहे तर विविध विद्यापीठांनी या ग्रंथाची विशेष शिफारस केली आहे.

सहकार चळवळीतील सर्वांनी अवश्य वाचावा, संग्रही ठेवावा असा ग्रंथ…. जय सहकार !!!

🇮🇳🇮🇳🇮🇳

सहकार महर्षी ग्रंथासाठी सहकार सुगंध पुणे कार्यालयात 8805981673 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments