Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedन्यू लॉ कॉलेज आयोजित "मंथन”समुपदेशन स्पर्धा दीक्षा धुमाळला प्रथम क्रमांक तर...

न्यू लॉ कॉलेज आयोजित “मंथन”समुपदेशन स्पर्धा दीक्षा धुमाळला प्रथम क्रमांक तर ऋचा ढमढेरे हिला द्वितीय स्थान

भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) न्यू लॉ कॉलेज, पुणे, पोस्ट ग्रॅज्युएट विभागाने ४ आणि ५ ऑक्टोबर रोजी “मंथन” द्वितीय इंट्रा कॉलेज बहु-भाषिक ग्राहक समुपदेशन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत : दीक्षा धुमाळ हिने विजेतेपदाचा अमृत चषक पटकाविला तर ऋचा ढमढेरे हिने द्वितीय उपविजेतेपदासाठी ठेवलेला कल्पवृक्ष चषक पटकाविला.

या स्पर्धेत विषय तज्ज्ञ आणि वकिली करणाऱ्या वकिलांनी ग्राहकांची भूमिका बजावली आणि सहभागी विद्यार्थ्यांनी वकिलांची भूमिका बजावली स्पर्धकांनी विविध विषयांवर त्यांना समुपदेशन केले. समुपदेशनाची भाषा मराठी, हिंदी आणि इंग्रजी मधुन स्पर्धकांनी निवडायची होती. या स्पर्धेत महाविद्यालयातील ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण स्पर्धा “समुद्रमंथन” या पौराणिक संकल्पनेवर तसेच अमृत विचारधारेसाठी विचारांचे मंथन अशा संकल्पनेवर चालली. स्पर्धेचे उद्दिष्ट श्रीकृष्णाप्रमाणेच सर्वोत्तम समुपदेशक मिळणे हे होते. कौटुंबिक वादात अर्जुनला योग्य मार्गदर्शन करणारा श्रीकृष्ण हा विश्वातील पहिला समुपदेशक आणि त्याचा सलोखा अहवाल म्हणजे श्रीमद् भगवत गीता, जी आजही लोकांना मार्गदर्शन करत आहे.
प्राथमिक फेरीमधे पंचतत्वावर आधारित पृथ्वी, अग्नि, वायु, आकाश आणि जल अशा 5 पॅनल मधे, उपांत्य फेरीला त्रिमूर्ती ब्रम्हा, विष्णू आणि महेश असे 3 पॅनलमधे तर अंतिम फेरीला अमृत पॅनेल अशी स्पर्धकांची विभागणी केली होती. स्पर्धेत कौटुंबिक विवाद, ग्राहक विवाद आणि एआय (artificial intelligence) विवाद यांसारख्या विषयांचा समावेश होता.
स्पर्धेचा निकाल : विजेती – अमृत चषक : दीक्षा धुमाळ, प्रथम उपविजेती : कल्पवृक्ष चषक : ऋचा ढमढेरे , द्वितीय उपविजेती : कौस्तुभ चषक : समृद्धी शहा. सर्वोत्कृष्ट समुपदेशक : ऐरावत चषक : सौ. प्रतिभा घोरपडे.
विशेष उल्लेखनीय पारितोषिक: केशव चषक : नियती. आणि माधव चषक : समर्थ हुंडेकर.

महाविद्यालयाच्या अधिष्ठाता, प्राचार्या व स्पर्धा समिती अध्यक्षा डॉ. उज्ज्वला बेंडाळे, उपप्राचार्य व स्पर्धेच्या सह-अध्यक्षा, डॉ. ज्योती धर्म, आयक्यूएसी समन्वयक व स्पर्धेच्या सह-अध्यक्षा डॉ. विद्या ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. न्यू लॉ कॉलेजचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. रोहित सुरवसे, मयुरा पवार आणि आकांक्षा घाटोळ यांनी समन्वयक म्हणून काम केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अंश, धवल, उज्ज्वल, देवांश, अंकित, देवेश, निनाद, प्रग्या, रिधीमा, सिद्धि या विद्यार्थी स्वयंसेवकांनीही उत्साहाने मोलाची कामगिरी केली.

महाविद्यालयाच्या पर्यावरण कक्षाच्या वतीने डॉ.ज्योती धर्म व डॉ.जयश्री खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पेपरलेस कामकाज, शून्य कचरा निर्मिती या संकल्पनेवर संपूर्ण स्पर्धा पार पडली. श्री. शुभम त्रिपाठी आणि श्री. स्वप्नील दाभोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण काम करण्यासाठी ही स्पर्धा क्लेव्हरग्राउंड सॉफ्टवेअरद्वारे समर्थित होती.

उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे डॉ.सागर पाठक ( स्त्रीरोगतज्ज्ञ, संस्थापक फोर C’s कौन्सिलिंग सेंटर) होते तर समारोप सत्राचे प्रमुख पाहुणे डॉ.शशिकांत हजारे (माजी प्राचार्य, आर्मी लाॅ काॅलेज), ॲड. एस. व्ही. अभंग (संस्थापक, लेक्स क्रेडेन्स), ॲड. हर्षद पुजारी (सहाय्यक प्राध्यापक, न्यू लॉ कॉलेज) हे होते. यावेळी २०२३-२४ च्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments