Friday, November 27, 2026
Google search engine
HomeUncategorized*पुण्यनगरीत अवतरला अक्षरवसंत* *दुसरे बालकुमार साहित्य संमेलन २०२६' चा पहिला दिवस...

*पुण्यनगरीत अवतरला अक्षरवसंत* *दुसरे बालकुमार साहित्य संमेलन २०२६’ चा पहिला दिवस सारस्वत तेजाने आणि अपूर्व जल्लोषात संपन्न!*

 

 

*पुणे: बालमनाच्या कोऱ्या पाटीवर कल्पनांचे इंद्रधनुष्य* उमटवत आणि *नव्या पिढीच्या करकमलांत वाचनसंस्कृतीचा तेजोमय दीप सुपूर्द* करत *जिल्हा परिषद, पुणे* आणि *अमरेन्द्र भास्कर बालकुमार मराठी साहित्य संस्था, पुणे* यांच्या *संयुक्त विद्यमाने आयोजित* *दुसरे बालकुमार साहित्य संमेलन 2026*’ या *सारस्वत महाकुंभाचा* पहिला दिवस आज, *शुक्रवार, दि.27 नोव्हेंबर 2026* रोजी *कोथरूड* येथील *यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अभूतपूर्व उत्साहात, मंगलमय वातावरणात* आणि *रसिकजनसागराच्या साक्षीने संपन्न* झाला.

 

💥*ग्रंथदिंडीचा जयघोष व दिमाखदारशारदास्तवन:*

*प्रभातीच्या मंगलमय उषाकाली*, सकाळी *7:30* वाजता ‘*प्रादेशिक मराठी बोली* आणि *अभिजात भारतीय भाषांचा’ गजर* करत निघालेल्या भव्य *ग्रंथदिंडीने अवघी कोथरूडनगरी अक्षरमय* आणि *भक्तीमय* झाली. या *सारस्वत यात्रेत* बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमित्ताने *जिल्हा परिषद शाळेतील 13 तालुक्यांतील चिमुकल्यांनी अभिजात भाषा* व *पारंपरिक भाषा वेशभूषेसह सादरीकरण* करुन *भारतमातेच्या ‘विविधतेतील एकतेचे’ विलोभनीय इंद्रधनुष्य* साकारले. *विविध राज्यांच्या पारंपरिक वेशभूषा* आणि *लोकसंस्कृतीचे जिवंत, सप्तरंगी दर्शन* घडवणाऱ्या या *शब्दांच्या पालखीने रसिकजनांची मने जिंकून* घेतली.

त्यानंतर ‘*माझी गोष्ट माझे पुस्तक*’ या सत्रात *ज्येष्ठ बालसाहित्यिक पद्मश्री माधुरी पुरंदरे* आणि *शिक्षणतज्ज्ञ श्रीमती मंजरी निंबकर* यांनी *सर्जनशीलतेचे कवडसे* उलगडत *बालमनांना मंत्रमुग्ध* केले.

 

💥 *मान्यवरांच्या उपस्थितीत*

*उद्घाटन:-*

*सकाळी 10:30* वाजता *जिल्हा परिषद अध्यक्ष मा. श्री. वीरधवल जगदाळे, यशदाचे अतिरिक्त महासंचालक मा. श्री. शेखर गायकवाड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी आणि यांच्या *शुभहस्ते सरस्वती पूजन, अजितदादा पवार प्रतिमापूजन* आणि *ज्ञानदीप प्रज्वलन* होऊन या *अक्षरोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन* पार पडले. यानंतर *लोणीकंदच्या बालचमूंच्या सुमधुर ईशस्तवन* व *स्वागतगीताने रसिकांना मंत्रमुग्ध* करत या *सोहळ्यात रंगत* आणली.

या *सारस्वत सोहळ्यास मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षण व क्रीडा समिती सभापती विवेक वळसे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, प्रकल्प संचालक संतोष हराळे, बालकलाकार कबीर खंदारे यांच्यासह सर्व विषय समिती सभापती, सदस्य व शिक्षणाधिकारी ललिता दहितुले आणि भाऊसाहेब कारेकर* यांची *वंदनीय उपस्थिती* लाभली.

*मनोगतातून प्रेरणादायी संदेश*:

•

*कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी* यांनी *जिल्हा परिषद शाळेचा माजी विद्यार्थी* असल्याचा *सार्थ अभिमान व्यक्त* करत, “*आम्ही बी घडलो… तुम्हीही घडा ना!”* असा प्रेरणादायी संदेश दिला.

 

•*शेखर गायकवाड* यांनी केवळ *टक्केवारीच्या आकडेमोडीत न अडकता विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव* देण्याचे *आवाहन* केले.

 

*गजानन पाटील* यांनी *आगामी नवनिर्मित लोणी काळभोर शाळेत दोन्ही साहित्य संमेलनांतील बालसाहित्य कायमस्वरूपी जतन* करून ठेवण्याची *आश्वासक ग्वाही* दिली.

 

💥*विचारमंथन (परिसंवाद)*: *ज्येष्ठ बालसाहित्यिक सुरेश सावंत, आबा महाजन* व *चित्रकार प्रियाल मोटे* यांनी *शब्द आणि रेषांच्या जादुई दुनियेवर बहारदार संवाद* साधला. यावेळी *सुरेश सावंत* यांनी ‘*एक बालक, एक शिक्षक आणि एक लेखणी* यांच्या *सामर्थ्याने जगात नक्कीच अमुलाग्र बदल घडू शकतो*,’ असा *ठाम विश्वास व्यक्त* केला.

*आबा महाजन* यांनी ‘*आपलं बुवा झकास असतं… डोक्याला अभ्यासाचं टेन्शनच नसतं*…’ या *खुमासदार कवितेने सभागृहात हास्याचे फवारे* उडवत *उपस्थितांचा ‘वन्समोअर’* मिळवला. *सलग पाच वेळा MPSC परीक्षेत अपयश* येऊनही *जिद्दीने यश मिळवल्याची* आणि *पुढे त्याच परीक्षेत स्वतःवरच प्रश्न विचारला गेल्याची प्रेरणादायी गाथा* सांगत त्यांनी *विद्यार्थ्यांना ‘पुस्तकांशी मैत्री करण्याचा’ मोलाचा संदेश* दिला.

*चित्रकार प्रियाल मोटे* यांच्या *संवादासोबत बालचित्रकारांनीही चित्ररेखाटनाचा मनसोक्त आनंद* लुटला. सत्राच्या *शेवटी* एका *बाललेखिकेने ‘लेखकांना गोष्टी कशा सुचतात?’* असा *मार्मिक प्रश्न* विचारला असता, हा *प्रत्येक लेखकाच्या मनातलाच प्रश्न* असल्याचे सांगत *आबा महाजन* यांनी तिचे *कौतुक* केले व तिला *सस्नेह पुस्तक भेट( दिले.

 

💥*नाट्याविष्कार (‘अलबत्या* *गलबत्या’)*: !

*रत्नाकर मतकरी लिखित अद्भुत, जादुई* आणि *अजरामर ‘अलबत्या गलबत्या’* या *बालनाट्याच्या प्रयोगाने नाट्यगृहात हास्याचे फवारे* आणि *टाळ्यांचा कडकडाट* घडवून आणला.

 

💥 *हृदयसंवाद(साहित्यीकांशी गप्पागोष्टी):-*

*99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मा.विश्वास पाटील* यांच्याशी *रंगलेल्या मैफिलीने अवघे सभागृह विचारांच्या श्रीमंतीने भारावून* गेले.

 

💥 *आधुनिक संवादाविष्कार(टेड टॉक/पॉडकास्ट):-*

*सायंकाळी क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम* चित्रपटातील *कलाकारांचे पथक,दिग्दर्शक हेमंत ढोमे* व *सुप्रसिद्ध युट्यूब ब्लॉगर सिद्धेश लोकरे* यांच्या *चैतन्यदायी संवादाने तरुणाई* व *बालकुमारांमधे नवा उत्साह* संचारला. आणि *पहिल्या दिवसाची सांगता अत्यंत जल्लोषात* झाली.

*जिल्हा परिषदेचे पदाधिकारी,संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे* व *कार्यवाह दिलीप गरुड* यांच्या *सुबक नियोजनाखाली पहिल्या दिवसाला अभूतपूर्व प्रतिसाद* लाभला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments