Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedप्रा. अस्मिता जोशी यांना वास्तुरचना शास्त्रात पीएचडी

प्रा. अस्मिता जोशी यांना वास्तुरचना शास्त्रात पीएचडी

पुणे, दि. 21 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (बीएनसीए) मधील प्रा. अस्मिता जोशी यांनी नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये पीएच. डी संपादन केली.

त्यांच्या संशोधनाचा विषय ‘सामाजिक-सांस्कृतिक मूल्ये आणि आकृतीबंधीत भूदृश्य यांच्यातील अनुबंधः संदर्भ पुण्यातील एकात्मिक नगर संस्थांमधील (टाऊनशिप) अभ्यास’ असा होता. हे संशोधन निवासी क्षेत्रांसाठी डिझाईन केलेल्या लॅण्डस्केप्समागील सामाजिक व सांस्कृतिक पैलूंबाबत मोलाचा दृष्टिकोन घडवते. पुण्यातील टाउनशिप्सबरोबरच अन्य सार्वजनिक जागा, नदीकाठ, धार्मिक तसेच सांस्कृतिक ठिकाणांमध्येही या संशोधनाचा प्रत्यक्ष अवलंब केल्यास नागरिकांना त्याचा लाभ घेता येईल.

प्रा. अस्मिता जोशी यांनी बीएनसीएतील संशोधन केंद्रातून त्यांचे संशोधन पूर्ण केले. बीएनसीएचे संशोधन केंद्रप्रमूख प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी त्यांना मार्गदर्शन केले. आतापर्यंत या केंद्रातून २३ जणांनी पीएचडी संपादन केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments