गुरुग्राम, २० ऑक्टोबर २०२४ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज नवी CB300F flex-fuel लाँच करत हरित वाहतुकीच्या स्थित्यंतराच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. पर्यावरणदृष्ट्या जागरूक असलेल्या रायडर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ही भारतातील पहिली ३०० सीसी फ्लेक्स- फ्युएल मोटरसायकल लाँच करण्यात आली आहे. ग्राहकांना आता त्यांच्या जवळच्या बिगविंग डीलरशीपकडे २०२४ होंडा CB300F फ्लेक्स फ्युएल बुक करता येणार असून तिची किंमत रू. १,७०,०० (एक्स शोरूम दिल्ली) आहे.
नवीन CB300F फ्लेक्स फ्युएल सादर करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. तुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘२०५० पर्यंत सर्व उत्पादनांमध्ये आणि कॉर्पोरेट कामकाजातील कार्बनचे प्रमाण शून्यावर आणण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे. शाश्वत उत्पादनाशी असलेल्या या बांधिलकीचा एक भाग म्हणून आम्ही आज
CB300F चे फ्लेक्स फ्युएल व्हर्जन सादर करण्याचे ठरवले आहे. ही गाडी उत्सर्जन कमी करून भारताच्या उर्जाविषयक गरजा पुरवण्याच्या आमच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. जागतिक स्तरावर फ्लेक्स फ्युएल तंत्रज्ञानातील दशकभरापेक्षा जास्त कौशल्याच्या मदतीने होंडाने ही मोटरसायकल खास तयार केली आहे. त्याद्वारे भारतीय दुचाकी बाजारपेठेसाठी फ्लेक्स फ्युएलचे सहज स्थित्यंतर घडवून आणले जाणार आहे. CB300F फ्लेक्स फ्युएलच्या लाँचमुळे भारत सरकारच्या इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल (ईबीपी) उपक्रमासाठी आमची बांधिलकी दिसून आली असून त्याद्वारे हरित, स्वच्छ भविष्याप्रती योगदान दिले जाणार आहे.’
या लाँचविषयी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे संचालक श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘ भारतीय ग्राहक सातत्याने चांगली कामगिरी देणाऱ्या मोटरसायकल्स पर्यावरणदृष्ट्या पूरक असाव्यात अशी मागणी करत आहेत. होंडाच्या CB300F मध्ये फ्लेक्स फ्युएल आधुनिक तंत्रज्ञान व पर्यावरणपूरकता यांचा योग्य मिलाफ साधण्यात आला असून रायडर्सना फ्लेक्स- फ्युएल पर्यायासह होंडाची प्रसिद्ध विश्वासार्हता व कामगिरीची खात्री देण्यात आली आहे. बाजारपेठेत हा नवा पर्याय आणण्यासाठी आणि प्रीमियम मोटरसायकल क्षेत्रात नवा मापदंड प्रस्थापित करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
पर्यावरणपूरक तरीही शक्तीशाली कामगिरी
होंडा CB300F फ्लेक्स- फ्युएल पर्यावरणपूरक तरीही शक्तीशाली कामगिरी करणारी आहे. त्यामधअये २९३.५२ सीसी, ऑइल- कुल्ड, ४ स्ट्रोक, सिंगल सिलेंडर पीजीएफ- एफआय इंजिन बसवण्यात आले आहे, जे ई८५ फ्युएल (८५ टक्के इथेनॉल आणि १५ टक्के गॅसोलिन) कमप्लाएंट आहे. हे इंजिन 18.3 kW उर्जा आणि 25.9 Nm टॉर्क देते.
या इंजिनमध्ये ६- स्पीड गियरबॉक्स बसवण्यात आले आहेत. त्यात असिस्ट स्लिपर क्लच बसवण्यात आला असून त्यामुळे पटकन गियर बदलण्यासाठी कमी ताकद लागते तसेच डाउन शिफ्टिंग करताना रियर व्हील हॉपिंग रोखले जाते.
अधिक चांगली हाताळणी आणि आधुनिक तंत्रज्ञान
सुरक्षा आणि कामगिरी यांचा मिलाफ साधणाऱ्या CB300F फ्लेक्स फ्युएलमध्ये दोन्ही टोकाचे डिस्क ब्रेक्स (276mm पुढचे आणि 220 एमएम मागचे) ड्युएल चॅनेल एबीएस आणि होंडाचे सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (एचएसटीसी) देण्यात आले आहेत. त्याशिवाय यातील गोल्डन युएसडी फ्रंट फोर्क्स आणि ५ स्टेप अडजस्टेबल रियर मोनो शॉक सस्पेन्शनमुळे रायडिंगचा आरामदायी अनुभव मिळतो. त्याशिवाय यात संपूर्ण एलईडी लायटिंग यंत्रणा देण्यात आली आहे.
CB300F’sच्या आधुनिक पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंटल पॅनेलमध्ये कस्टमाइज करता येण्यासारखा ५ स्तरीय ब्राइटनेस देण्यात आला आहे तसेच त्यात स्पीडोमीटर, ओडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गॉज, ट्विन ट्रिप मीटर्स, गियर पोझिशन इंडिकेटर्स आणि घड्याळ देण्यात आले आहे. त्याशिवाय इंटेलिजंट इथेनॉल इंडिकेटर देण्यात आले आहे, जे वाहनामध्ये जास्त इथेनॉल असलेले गॅसोलिन (८५ टक्क्यांपेक्षा जास्त) भरले गेल्यास तशी सूचना देते.
किंमत, रंग आणि उपलब्धता
CB300F फ्लेक्स- फ्युएलच्या मदतीने एचएमएसआय ग्राहक तसेच पर्यावरणाच्या गरजा पुरवण्यासाठी आवश्यक आधुनिक व नाविन्यपूर्ण सुविधा पुरवत दुचाकी वाहतुकीच्या भविष्याला आकार देत आहे.
२०२४ होंडा CB300F फ्लेक्स फ्युएल एकाच व्हेरिएंटमध्ये आणि दोन रंगांच्या पर्यायात – स्पोर्ट्स रेड व मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक, उपलब्ध करण्यात आली आहे. या गाडीची किंमत रू. १,७०,००० (एक्स शोरूम दिल्ली) ठेवण्यात आली आहे. बुकिंग सुरू झाले असून ही गाडी होंडाच्या देशभरातील बिगविंग वितरकांकडे ऑक्टोबर २०२४ च्या शेवटच्या आठवड्यापासून उपलब्ध असेल.
किंमत (एक्स शोरूम दिल्ली)
रू.१,७०,०००
रंगांचे पर्याय
स्पोर्ट्स रेड व मॅट अक्सिस ग्रे मेटॅलिक


