बंगलोर, कर्नाटक, २४ ऑक्टोबर २०२४: भारतातील हमखास आवडीचा युथ वॉच ब्रँड, फास्ट्रॅकने नवे “आफ्टरअवर्स” कॅम्पेन सुरु करून सणासुदीच्या उत्साहामध्ये नवी ऊर्जा आणली आहे. आफ्टरअवर्स वाईब सगळ्यांनाच हवीहवीशी वाटते, म्हणूनच फास्ट्रॅकने सादर केले ऑप्युलन्स कलेक्शन – सोहळा, मौजमस्ती संपू नये असे ज्यांना वाटते अशांसाठी हे सुंदरसे पार्टी कलेक्शन तयार करण्यात आले आहे.
या कलेक्शनमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी तयार करण्यात आलेल्या वेगवेगळ्या स्टाईल्स आहेत. पुरुषांसाठीचे, फास्ट्रॅकचे पहिले सन-मून क्रोनोग्राफ या कलेक्शनची खासियत आहे. दिवस असो वा रात्र, या अनोख्या डिझाईनचा ताजेपणा अजिबात कमी होत नाही.
उत्सव सरतात आणि खऱ्या पार्टीला जेव्हा सुरुवात होते तेव्हाचे अविस्मरणीय क्षण या कॅम्पेनमध्ये टिपण्यात आले आहेत. कौटुंबिक परंपरा आपल्याला सगळ्यांनाच आवडतात पण अगदी मनापासून सांगायचे तर, खरी रात्र सुरु होते जेव्हा फक्त तुम्ही आणि तुमचे खास प्रियजन असतात, संगीत सुरूच असते आणि आफ्टरपार्टीला सुरुवात होते.
‘आफ्टरअवर्स’ कॅम्पेनमध्ये आहेत, रात्री उशिरा केलेल्या गप्पागोष्टी, उस्फुर्तपणे केलेले डान्स, सखोल चर्चा आणि असे क्षण जे रात्र संपल्यानंतर देखील तुमच्या सोबत राहतात. हे कॅम्पेन आफ्टरअवर्सचा, निवांतपणाचा आणि अशा वेळी ज्या सर्वोत्तम आठवणी तयार होतात त्यांचा आनंद घेण्याविषयी आहे.
महिलांसाठी या कलेक्शनमध्ये ब्रेसलेट स्टाईलची घड्याळे आहेत, कौटुंबिक कार्यक्रम असोत किंवा आफ्टरपार्टी, ही घड्याळे अगदी साजेशी आहेत. भावंडांना भेटायला जायचे असेल किंवा मित्रमैत्रिणींसोबत पार्टी असेल, शो-ऑफ करण्यासाठी ही घड्याळे परफेक्ट प्लस-वन आहेत.
फास्ट्रॅकचे हेड ऑफ मार्केटिंग डॅनी जेकब म्हणाले, “ज्यांच्यासाठी रात्र कधीच सरत नाही अशा पिढीसाठी आम्ही ‘आफ्टरअवर्स’ कॅम्पेन तयार केले आहे. हे कॅम्पेन अशा क्षणांबद्दल आहे जे युवा संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे, उस्फुर्त मजामस्ती, मनातल्या गुजगोष्टी आणि उत्सव संपल्यानंतर देखील तुम्हाला ताजेतवाने ठेवणारी ऊर्जा, असे अनेक क्षण यामध्ये टिपले गेले आहेत. दिवस ते रात्र बदल सहजपणे करायचा असेल तर ही घड्याळे उत्तम ऍक्सेसरी आहेत.”
या कलेक्शनमधील घड्याळांच्या किमती ५,७९५ रुपयांपासून पुढे आहेत. उत्सवांची मौज संपूच नये असे वाटणाऱ्या प्रत्येकाकडे हे कलेक्शन असायलाच हवं. जवळच्या फास्ट्रॅक स्टोरमध्ये, फास्ट्रॅकच्या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा टायटन वर्ल्डमध्ये आणि देशभरातील इतर अधिकृत डीलर्सकडे ही घड्याळे खरेदी करता येतील. यंदाच्या सणासुदीच्या काळात फास्ट्रॅकसोबत साजरी करा तुमची आफ्टरपार्टी. ही घड्याळे बनतील तुमच्या अविस्मरणीय रात्रींसाठी सर्वोत्तम ऍक्सेसरी! दिवे मंद होत जातील, मजा सुरु होईल, ही घड्याळे तुमची साथसोबत करत राहतील.


