Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरुग्णसेवेबरोबरच मतदान जनजागृती मध्ये डॉक्टरांचा सहभाग*

रुग्णसेवेबरोबरच मतदान जनजागृती मध्ये डॉक्टरांचा सहभाग*

*

पुणे,दि.२५:- मतदारांचे पद्धतशीर शिक्षण आणि निवडणूक सहभाग (स्वीप) याद्वारे निवडणूक आयोगातर्फे मतदारांनी निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि मोठ्या प्रमाणावर मतदान करावे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांतर्गत चिंचवड मतदारसंघात विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने औंध जिल्हा रुग्णालय येथे मतदान जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांना तसेच कर्मचाऱ्यांना ‘मी मतदान करणार, आपल्या देशाचे भवितव्य घडविणार’ अशी शपथ देण्यात आली. रुग्णसेवेबरोबरच मतदान जनजागृती मध्ये डॉक्टर्स सहभागी झाले. परिसरातील नागरिकांनीही उपक्रमात सहभागी होऊन मतदानाची शपथ घेतली. कोणत्याही अमिषाला बळी न पडता प्रत्येक नागरिकाने निर्भय वातावरणात मतदान करून लोकशाही बळकट करण्यासाठी हातभार लावणे तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावणे गरजेचे आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला. तसेच मतदान करताना काय करावे आणि काय करू नये याबाबत देखील उपस्थित मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले.

स्वीप कक्षाचे समन्वय अधिकारी राजीव घुले यांच्यासह स्वीप कक्षाचे गणेश लिंगडे, अंकुश गायकवाड, प्रिन्स सिंह यांनी मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी झाले होते. निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments