Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक निरीक्षकांची भेट*

जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास निवडणूक निरीक्षकांची भेट*

*

पुणे, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाकडून १९५ जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून पिगे लिगू यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयास भेट देवून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला.

निवडणूक निरीक्षक श्री. पिगे लिगू यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील नामनिर्देशन प्रक्रियेची पाहणी निवडणूक कामकाजाची कामकाजाची माहिती घेतली. तसेच लेण्याद्री येथील स्ट्राँग रूम, मतमोजणी कक्ष, मतदान साहित्य वितरण व स्वीकृती केंद्राचीही पाहणी केली. निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी निवडणूक कामकाज विषयक सर्व कक्षांची माहिती दिली.

श्री. पिगे लिगू यांचा निवासाचा पत्ता व्हीव्हीआयपी विश्रामगृह, पुणे येथील कक्ष क्रमांक ए-२०२ असा आहे. त्यांना सकाळी १० ते ११ यावेळेत भेटता येईल. श्री. पिगे लिगू यांचे संपर्क अधिकारी प्रकाश जगताप हे असून त्यांचा संपर्क क्रमांक ९८८१३२३२३२ असा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments