Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedभव्य सामूहिक रामरक्षा आणि गीतरामायण बालचमूंच्या स्वरातून ग्रंथ पारायण दिंडी आणि सहयोगी...

भव्य सामूहिक रामरक्षा आणि गीतरामायण बालचमूंच्या स्वरातून ग्रंथ पारायण दिंडी आणि सहयोगी संस्थेच्या वतीने आयोजन

पुणे : ग्रंथ पारायण दिंडी यांच्यासह भक्तीसुधा फाउंडेशन, चौफेर प्रतिष्ठान आणि समर्थ व्यासपीठ यांच्यावतीने भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावर लहान मुलांचे भव्य सामूहिक रामरक्षा पठण आणि गीतरामायण पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सारसबाग गणपती मंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती ग्रंथ पारायण दिंडीचे प्रमुख वीरेंद्र कुंटे यांनी दिली.

संघटित शक्तीच्या हुंकाराने धर्म जागर करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात ८ ते १४ वयोगटातील बालकलाकारांकडून गुरु व गायिका भाग्यश्री केसकर व गायिका पल्लवी पोटे यांच्या नेतृत्वात हा गीतरामायणचा कार्यक्रम होणार आहे. पुण्यात घरोघरी आणि तुळशीबाग मंदिरात वर्षभर सुरू असलेल्या १३ लक्ष रामरक्षा पठणाची सांगता अयोध्येत २२ आणि २३ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.

राष्ट्र मंदिर पुनर्निर्माणासाठी, असुर अधर्म प्रवृत्ती नाश करून धर्म संस्थापनेसाठी, संघटित शक्तीच्या हुंकारासाठी, दिव्य सांस्कृतिक परंपरेचे संवर्धन करण्यासाठी, वसुंधरा व सर्व प्राणीमात्रांसह विश्व कल्याणाचा हेतू अशा ५ संकल्पना द्वारे ५ वेळा रामरक्षा पठण केले जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments