Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedअष्टसहस्त्र दीपोत्सवाच्या 'नव तपपूर्तीची सुरुवात' दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा...

अष्टसहस्त्र दीपोत्सवाच्या ‘नव तपपूर्तीची सुरुवात’ दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट ; शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे एसएसपीएमएस शाळेच्या प्रांगणातील श्री शिवछत्रपती स्मारका समोर सलग १३ वे वर्षे दीपोत्सव

पुणे : शिवजयंती महोत्सव समिती, पुणे तर्फे दिवाळी पाडवा शनिवार, दि. २ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता “श्री छत्रपती शिवाजी महाराज दीपोत्सव सोहळा” पर्व १३ वे नव तपपूर्तीची सुरुवात आयोजन श्री शिवछत्रपती स्मारक, एसएसपीएमएस शाळा प्रांगण, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. दीपोत्सवाचे उद्घाटन शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

शिवछत्रपतींचा हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षी छत्रपती शाहु महाराज पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा ९७ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे प्रत्येक किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे.

श्रीमंत देवराव राजे हांडे, श्रीमंत भोईटे सरकार, श्रीमंत सरदार बापूजी मांढरे ह्या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागााची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन तसेच राजे साळुंखे चालुक्य राजवंव, स्वराज्यनिष्ठ बाबर, सिंहगड वीर विठोजी कारके या स्वराज्यघराण्यांचा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात पदार्पण केल्याबद्दल दीपोत्सवाचे सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.

दीपोत्सवाचे आयोजन दीपोत्सवाचे संकल्पक समितीचे संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, रवींद्र कंक, सचिन पायगुडे, शंकर कडू, समीर जाधवराव, निलेश जेधे, गोपी पवार, प्रवीण गायकवाड, मोहन पासलकर, किरण शितोळे, महेंद्र भोईटे, किरण देसाई, मयुरेश दळवी यांसह असंख्य स्वराज्यबांधवांनी केले आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने या अनोख्या नेत्रदिपक दीपोत्सवा मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments