*
पुणे,दि.०१:- भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणीच्या तरतूदीनुसार चिंचवड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची तपासणी चिंचवड विधानसभा मतदारसंघ निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय, पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगाव येथील तिसऱ्या मजल्यावरील निवडणूक खर्च व्यवस्थापन कक्षात तीन टप्प्यात होणार आहे. या तपासणीमध्ये उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंतच्या खर्चाचे सनियंत्रण करण्यात येणार आहे.
उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १८ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १२-३० वा. निवडणूक खर्च निरिक्षक प्रेम प्रकाश मीना यांच्या उपस्थितीत होईल. उमेदवाराने दररोज केलेल्या खर्चाचा तपशील, बँक पासबूक व सर्व देयकांच्या मूळ पावत्यांसह विहित वेळेत खर्चाचा तपशील तपासणीसाठी सादर करावा, असे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार यांनी कळविले आहे.
०००