अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद आणि मातृशक्तीच्या सदस्यांनी आज सकाळीच पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले आणि आरती केली.या शिष्टमंडळाने राष्ट्रीय सुरक्षा, शांतता आणि देशाच्या समृद्धीसाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. या सुवर्ण संधीचे आणि दर्शनाचे नियोजन वायुदलाचे माजी सैनिक श्री अशोकजी तिवारी यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या विश्वस्तांशी समन्वय साधून अत्यंत नेटकेपणाने केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष श्री महेशजी सूर्यवंशी यांनी या प्रसंगी माजी सैनिकांना सुलभ व शिस्तबद्ध दर्शन घडवून आणण्यासाठी विशेष सहकार्य केले. यामुळे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना उत्तमरीत्या दर्शन घेता आले.
दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना वायुदलाचे माजी सैनिक श्री तिवारी यांनी ट्रस्टच्या विश्वस्तांचे विशेष आभार मानले. माजी सैनिक आणि मातृशक्तीबद्दल विश्वस्तांनी दाखवलेली आपुलकी आणि आदराबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ट्रस्टच्या वतीने माजी सैनिकांच्या देशसेवेचा सन्मान करत संपूर्ण शिष्टमंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
‐————————————-


