Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedनांदेड फाट्याजवळील असाही एक आनंदी आशिर्वाद वृद्ध निवास : विकास देडगे यांच्या...

नांदेड फाट्याजवळील असाही एक आनंदी आशिर्वाद वृद्ध निवास : विकास देडगे यांच्या प्रयत्नातून कार्यरत

🚩🚩🚩
*नांदेड फाट्याजवळील असाही एक आनंदी आशिर्वाद वृद्ध निवास : विकास देडगे यांच्या प्रयत्नातून कार्यरत आहे*

*नांदेड फाट्या जवळील श्री स्वामी कृपा आशीर्वाद वृद्ध निवास येथील वृद्धाश्रमात आज नांदेड सिटी तील निवृत्त जेष्ठांची* मेलेडि संगीत गाण्यांची मैफिल झाली
सन २०१२ पासून *नर पूजा हीच नारायण पूजा या सद्गुरूंच्या शिकवणीनुसार* ना नफा ना तोटा या तत्त्वावर ज्येष्ठ मंडळींसाठी *हे सेवा कार्य सुरू केलेले आहे तसेच निवासी मतिमंद मुलांसाठी पण ही संस्था काम करत असून येथील वृद्धाश्रमात सध्या १८ जण* वास्तव्यास आहेत
आश्रमा द्वारे विविध प्रकारचे *सम्राणी कप धूप तसेच गणेशोत्सवात गणपतीचे मखर बनवून विविध प्रदर्शनामध्ये त्याची विक्री करून आम्ही हे सेवा कार्य तन-मन-धनाने करत आहोत*
या कार्यामध्ये दानशूर व्यक्तींचे *आशीर्वाद व पाठबळ तसेच सहकार्य घेऊन* हे सेवा कार्य अविरत सुरू आहे
*एकदा आपण समक्ष भेट देवून या सेवा कार्यास आपली मदत व आशिर्वाद आम्हाला द्यावे* ही आपणास विनंती
कार्यक्रमाचे आयोजन *सर्वगुण संपन्न अशा नांदेड सिटी तील सेवा प्रमुख श्री मिलींद दीक्षित* यांनी केले होते
सुरुवातीस *स्वामींचे पुजन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री प्रकाश गोरे* यांच्या हस्ते झाले सिंहगड भागातील *स्वानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि उद्योजक श्री सुधीरजी काळकर* हेही उपस्थित होते

*संस्थापक अध्यक्ष* विकास बबन देडगे
*मो नं ९५४५८४३५४९* नांदेड फाटा 🙏

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments