Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedकसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर*

*

पुणे, दि. ४ : भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेखे तपासणीच्या तरतूदीनुसार कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या दैनंदिन खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

उमेदवारांच्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरीक्षक उमेश कुमार यांच्या उपस्थितीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ कार्यालय, श्री गणेश कला क्रीडा कलामंच, स्वारगेट येथील खर्च नियंत्रण कक्षात करण्यात येणार आहे. खर्च तपासणी तीन टप्प्यात होणार असून उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी १३ नोव्हेंबर रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments