Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedपर्वतीतील सर्वच प्रभागांमध्ये पोहोचणार मेट्रो आमदार माधुरी मिसाळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा...

पर्वतीतील सर्वच प्रभागांमध्ये पोहोचणार मेट्रो आमदार माधुरी मिसाळ यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा हे

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाचा पहिल्या टप्प्यात समावेश करण्यात यश मिळविले असून, सातत्यपूर्ण पाठपुराव्याने खडकवासला-स्वारगेट-खराडी या दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोला राज्य शासनाची मान्यता मिळविली आहे. त्यामुळे पर्वती मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये मेट्रोची सुविधा मिळणार असल्याचा दावा आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.

मिसाळ यांनी वाळवेकर गार्डन परिसरात आज नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला. माजी नगरसेवक महेश वाबळे, आनंद रिठे, प्रशांत जगताप, कैलास मोरे, प्रशांत थोपटे, रवींद्र चव्हाण, औदुंबर कांबळे, शीतल मोरे, संध्या नांदे, शिवाजी भागवत, रामदास शिंदे, रमेश कुदळे, बिपीन पोतनीस, मनोज कुदळे, विकास कांबळे, विकास पुलावळे, अनिल जाधव, गणेश सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिसाळ म्हणाल्या, “स्वारगेट ते पिंपरी चिंचवड आणि वनाज ते रामवाडी हा पुणे मेट्रोचा सुमारे 33 किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्वारगेट मेट्रो स्टेशनला प्रवाशांची पहिली पसंती मिळत आहे. मेट्रोमुळे सुरक्षित, आरामदायी, किफायतशीर व जलद प्रवासाची सुविधा पुणेकरांना मिळत आहे.”

मिसाळ पुढे म्हणाल्या, ‘मेट्रोमुळे उद्योग, व्यवसाय, रोजगारांच्या संधींमध्ये वाढ होणार आहे. शहराच्या विविध भागांतील उपनगरे मेट्रो मार्गांमुळे जोडली जात आहेत. या प्रकल्पामुळे वेळेची मोठी बचत होत आहे. स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड प्रवास अवघ्या 27 मिनिटे 20 सेकंदामध्ये होत असून, स्वारगेट ते शिवाजीनगर आणि मंडईपर्यंतच्या प्रवासाला अनुक्रमे अवघी 5 मिनिटे 27 सेकंद व 3 मिनिटे इतका कमी वेळ लागत आहे. त्यामुळे ती प्रवाशांच्या पसंतीस उतरली आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments