पुणे,७ नोव्हेंबर २०२४ :
एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे येथे दिनांक 11,12 13 नोव्हेंबर रोजी ‘विनामूल्य त्वचाविकार तपासणी शिबीर’ आयोजित करण्यात करण्यात आले आहे. यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व सल्ला मोफत देण्यात येणार आहे. गजकर्ण,मुरूम,काळे डाग,पांढरे डाग, सोयरायसीस, अॅलर्जी, केस गळणे या व इतर सर्व प्रकारच्या त्वचाविकार असणाऱ्या गरजू रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. शिबिरासाठी पूर्वनावनोंदणी आवश्यक संपर्क – 020-67029100