Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedदेशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही. - केंद्रीय मंत्री किरण...

देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही. – केंद्रीय मंत्री किरण रिजिजु

संसदीय कार्य मंत्री डॉ. किरण रिजिजू पत्रकार परिषद
पुणे, प्रतिनिधी –
देशाच्या स्वातंत्र्यानंतर ‘संविधान दिवस ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशात प्रथम सुरू केला. ७५ वर्ष मुस्लिम समजास देखील काँग्रेसने व्होट बँक म्हणून राजकारणात वापर केला. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी नेहमी जात व धर्म बाबत राजकारण केले आहे. राहुल गांधी प्रगल्भ नेते म्हणून कधी उदयास आले नाही कारण त्यांच्या अंतर्मनातून कधी तशी भावना निर्माण झाली नाही. अमेरिका मध्ये जाऊन देशाला शिव्या देऊन नेता होऊ शकत नाही. देश जनतेचा असून कोणत्या एका परिवाराचा नाही. काँग्रेससाठी एक परिवार महत्वाचा आहे पण आमच्यासाठी देश प्रथम आहे. काँग्रेस काळात गरीब देश म्हणून भारताला हिणवले जात होते पण मोदी यांच्या काळात बदल होऊन देशाचा मान जगात वाढला आहे असे मत संसदीय कार्य मंत्री डॉ. किरण रिजिजू यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
यावेळी भाजप पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, पुष्कर तुळजापूरकर, हेमंत लेले, निवेदिता एकबोटे , अतुल सावे, मिलिंद कांबळे उपस्थित होते.
डॉ. किरण रिजिजू म्हणाले, पुण्यात येणे मला खूप आवडते कारण हे ऊर्जेचे केंद्र आहे. महाराष्ट्र मधील निवडणूक देशाचे दृष्टीने महत्वाची आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून देशात उद्योग निर्मिती केंद्र महाराष्ट्र आहे. लोकसभा निवडणुकी नंतर विधानसभा निवडणुक पर्यंत अनेक गोष्टी बदललेल्या आहे. काँग्रेसला लोकसभा मध्ये जनतेची दिशाभुल करून काही मते मिळाली होती पण आता त्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यामुळे त्यांना आता जनता समर्थन मिळणार नाही. महायुतीला राज्यात बहुमत मिळेल असे सध्या दिसून येत आहे. मुंबई मध्ये मी अनेक वर्ष आलो आहे आज मुंबई जागतिक शहर बनले आहे. अनेक पुल, उड्डाणपूल, बोगदे, रस्ते यामुळे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला आहे. समृध्दी महामार्गमुळे नागपूर देखील जवळ आले आहे. लाडकी बहिण योजना मुळे महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्या खुश आहे. गरिबांना देखील न्याय देण्याचे काम जनतेने केले आहे. काँग्रेसचा गट यामुळे अस्वस्थ होऊन त्यांनी काही घोषणा सुरू केल्या पण त्यावर आता मतदार यांचा विश्वास नाही. गरीबी हटाओ नारा काँग्रेसने दिला पण त्याची पूर्तता मोदी सरकारने केली. सिमवर्ती भागात मी राहतो चीन सोबत जाणारे रस्ते अस्तित्वात नव्हते पण मोदी यांनी पक्के रस्ते सर्व ठिकाणी तयार करून पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागपूर मध्ये बनावट पुस्तक हातात धरून संविधान नारा दिला पण आम्ही त्यांचा बनाव उघड केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विविध गोष्टीतून त्रास देण्याचे काम सातत्याने काँग्रेसने केले आहे. त्यांना भारतरत्न देखील त्यांनी जाणीवपूर्वक दिले नाही. संविधानाचा मुळ आत्मा बदलण्याचे काम काँग्रेसने केले त्याचे उत्तर त्यांनी द्यावे.
मणिपूर बाबत काँग्रेसने आतंकवाद अड्डा बनवला असल्याचे दाखवले पण त्याठिकाणी झालेला दोन समाजातील वाद हा गैरसमजुती मधून घडलेला आहे. देशाचा तो भाग असून त्याठिकाणी शांतता प्रस्थापित होत आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही

जम्मू काश्मीर मध्ये कलम ३७० मुळे संविधान त्याठिकाणी लागू होत नव्हते किंवा आरक्षण दिले जात नव्हते. पण ते कलम काढल्यामुळे आता मागास वर्गीय नागरिकांना आरक्षण लाभ मिळत आहे. आता काँग्रेस तेथील नागरिकांचे आरक्षण बंद करण्यासाठी धडपड करत आहे.कलम ३७० आम्ही त्याठिकाणी पुन्हा लागू करून देणार नाही. दिवाळीत भारतीय लष्कराने सीमावर्ती भागात चीन लष्करास मिठाई दिली , ते मिठाई जास्त खात नसताना देखील त्यांनी ती खाल्ली. मोदी यांच्या काळात आपल्या देशाच्या जमिनीवर कोण अतिक्रमण करू शकत नाही किंवा हिस्कावून घेऊ शकत नाही असे रिजिजू यांनी सांगितले. जगातील सर्वाधिक वक्फ बोर्ड जमीन भारतात आहे त्या गरीब मुसलमान यांना मिळाल्या पाहिजे असे आमचे मत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments