Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंबेगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी*

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी*

*

पुणे, दि. ९: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात नियुक्त खर्च निरीक्षक व्यंकादेश बाबू यांच्या उपस्थितीत ११ उमेदवारांच्या खर्चाची प्रथम तपासणी करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे यांनी दिली आहे.

या तपासणी दरम्यान सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संजय नागटिळक, सहायक खर्च निरीक्षक संदीप ओव्हाळ, नंदू पाचंगे, खर्च ताळमेळ समितीचे पथक प्रमुख विजय दांगट, खर्च ताळमेळ समितीमधील सर्व सदस्य, सर्व ११ उमेदवार व त्यांचे खर्च प्रतिनिधी उपस्थित होते.

खर्च ताळमेळ प्रकियेदरम्यान खर्चात तफावत आढळणार नाही याची सर्व उमेदवारांनी दक्षता घेण्याचा सूचना खर्च निरीक्षक श्री. व्यंकादेश बाबू यांनी केल्या. सर्व उमेदवारांच्या निवडणूक विषयांच्या खर्चाची दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी तर तिसरी तपासणी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल असे श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments