Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedवाचकांची कमांड असणारा कमांडर दिवाळी अंक .

वाचकांची कमांड असणारा कमांडर दिवाळी अंक .

*
‘कमांडर’चा या वर्षीचा २८ वा दिवाळी अंक ‘रंगकर्मी विशेषांक’ (नाटक नाटक आणि नाटक) असा आहे.
गेली 27 वर्ष ‘कमांडर’ ने वेगवेगळ्या विषयांवर अत्यंत वाचनीय आणि संग्राह्य असे विशेषांक प्रकाशित केले आहेत.
दर वर्षी एखादा विशिष्ट विषय घेऊन त्यावर संपूर्ण अंक प्रकाशित करणं हे ‘कमांडर’चं खास वैशिष्ट्य. यात प्रामुख्याने अभिनेत्री, अभिनेता, खलनायक – खलनायिका, विनोदी कलावंत, गीत संगीत, दिग्दर्शक, फाळके पारितोषिक विजेते चित्रपट, राष्ट्रीय पारितोषिक विजेते चित्रपट, लोक संस्कृती-लोक परंपरा, युद्ध कोरोना विरुध्द जनजागृती, मनोरंजन माईलस्टोन चित्रपट आणि HOLLYWOOD चित्रपट असे विशेषांक प्रकाशित केले आहेत.
या वर्षी एक नवीन प्रयोग म्हणून जुन्या-नव्या नाटकांची रोचक माहिती देऊन अंक सजवण्यात आलाय. यंदाच्या ‘रंगकर्मी विशेषांक’ या अंकात नाटकांबाबत मान्यवर लेखकांचे लेख आहेत. यातील काही कलाकृती तर आजही सर्वश्रेष्ठ म्हणून ओळखल्या जातात. उदा.’नटसम्राट’, ‘तो मी नव्हेच’, ‘ती फुलराणी’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘हमीदाबाईची कोठी’ वगैरे नाटकं ही रंगभूमीवरील मैलाचे दगड म्हणून आजही तितकीच लोकप्रिय आहेत.
तसंच यापूर्वी ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘बॅरिस्टर’ ही नाटकं वेगवेगळ्या कलाकार संघात कित्येक वेळा पाहिलेले प्रेक्षकदेखील, ही नाटकं नव्या संघात नव्याने आली की पुन्हा तेवढ्याच उत्साहाने ती अनुभवायला तेवढीच गर्दी करतात, म्हणून त्यांच्या लेखांचाही आवर्जून समावेश केला आहे.
याशिवाय ‘पुरुष’, ‘अलबत्या गलबत्या’, ‘वस्त्रहरण’, ‘आरण्यक’, ‘आई रिटायर होतेय’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘वाटेवरती काचा गं’, ‘लाली-लिला’, ‘गाजराची पुंगी’ सारख्या वेगळ्या किंवा वेगळ्या विषयांवरील नाटकांच्या लेखांचा देखील या अंकात समावेश करण्यात आला आहे. तर ‘रंगभूमी व्यवस्थापन’ आणि ‘हिंदी नाट्यविषयक नियतकालिकं’ हे रंगभूमीसंलग्न वेगळ्या विषयांचे लेख घेतले आहेत. ‘संस्कृतीचा समर्थ वारसा’, ‘समृद्ध सुवर्णमयी मराठी रंगभूमी’ या लेखांमध्ये मराठी रंगभूमीच्या वैभवशाली इतिहासाचं सिंहावलोकन आहे. याशिवाय ‘गुजराती रंगभूमी’, ‘पाश्चात्य रंगभूमी’ हे मराठी रंगभूमीशिवाय इतर रंगभूमीवरील लेख समाविष्ट केले आहेत.
*अंतरंग*
या अंकात ५१ नाट्य विषयक लेख आहेत. यात प्रामुख्याने डॉ. वि. ल. धारुरकर (नटसम्राट), श्रीनिवास नार्वेकर (रायगडाला जेव्हा जाग येते), प्रफुल्ल फडके (लग्नाची बेडी ), दिलीप ठाकूर (नाटकांवर आधारित चित्रपट), संजय डहाळे (सही रे सही), राजीव जोशी (पुरुष – गुजराती रंगभूमी), सुवर्णा बेडेकर (ती फुलराणी), श्रीनिवास बेलसरे (डॉक्टर तुम्हीसुद्धा), मीना नाईक (वाटेवरती काचा गं ), दीपक सातपुते (सविता दामोदर परांजपे), रणजीत मसुरेकर (फक्त एकदाच) शरद कोरडे( तो मी नव्हेच ), रविंद्र देवधर (वस्त्रहरण – कुर्यात सदा टिंगलम – नातीगोती), सना पंडित (आरण्यक – हमीदाबाईची कोठी), अपर्णा कुलकर्णी (आई रिटायर होतेय), राम खेडकर(थँक्यू मिस्टर ग्लाड), अजितेम जोशी (नाथ हा माझा), सुधीर सेवेकर (बॅरिस्टर), प्रकाश राणे (मंच ते मंचक ते मंच), श्रीकांत कुलकर्णी (ऑल द बेस्ट), मल्हार दामले (मोरूची मावशी), धनंजय कुलकर्णी (बालगंधर्व), मिलिंद कल्याणकर (गेला माधव कुणीकडे), बंडा बंडा यज्ञपवित (गुंतता हृदय हे) डॉ. प्रा. बाबा बोराडे (गाढवाचे लग्न) प्रा. डॉ. मोहन फुले (वऱ्हाड निघाले लंडनला), शोभना मयेकर (लाली लिला), श्रीकांत सराफ (पार्टी), रमेश धनावडे (नाट्य अवलोकन), शिरीष कुलकर्णी (रंगभूमी व्यवस्थापन), समीर दळवी (नाट्य विषयक नियतकालिकं), डॉ संपदा कुलकर्णी (महानिर्वाण), देवेंद्र प्रभुणे (घाशीराम कोतवाल व पाश्चात्य रंगभूमी), डॉ. राजू पाटोदकर (समृद्ध रंगभूमी – आमदार सौभाग्यवती), गिरीश दीक्षित (विच्छा माझी पुरी करा) तसंच अभय कुलकर्णी (ज्युलियस सीझर) या मान्यवरांचे लेख आहेत.
*ठळक वैशिष्ट्ये*
कमांडर…दिवाळी अंक.
रंगभूमी विशेषांक…वर्ष 28 वे.
*संपादक*
*डॉ. राजू पाटोदकर व प्रा. डॉ संजय पाटील- देवळाणकर*
*पृष्ठ संख्या 192** *स्वागतमूल्य 150 रुपये*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments