Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorized*जुन्नर मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ संपन्न*

*जुन्नर मतदारसंघात मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ संपन्न*

पुणे, दि. 10 : जुन्नर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रांसाठी आवश्यक असणाऱ्या मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून संपन्न झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.

या प्रक्रियेवेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनिल शेळके, ईव्हीएम नोडल अधिकारी यांच्यासह उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी श्रीमती घाटगे यांनी जुन्नर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी रिंगणात असलेले उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रियेची माहिती दिली. एकूण 427 बॅलेट युनिट, 427 कंट्रोल युनिट आणि 462 व्हीव्हीपॅट यांची यावेळी सरमिसळ करण्यात आली.

मतदान केंद्रावर पाठविले जाणारे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे सरमिसळ प्रक्रियेच्या माध्यमातून निश्चित करण्यात आली असून प्रत्यक्ष मतदानाच्या आधी ही सर्व मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती श्रीमती घाटगे यांनी यावेळी दिली.
000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments