Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी जुन्नर विधानसभा मतदारसंघात चार पथके नियुक्त*

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी जुन्नर विधानसभा मतदारसंघात चार पथके नियुक्त*

*
पुणे,दि. 10 : जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 85 वर्षे वयावरील 125 ज्येष्ठ नागरिक तसेच 9 दिव्यांग अशा एकूण 134 मतदारांच्या गृहमतदानासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे यांनी दिली आहे.

जुन्नर विधानसभा मतदारसंघांमध्ये 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. वय 85 वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या ज्या मतदारांनी अशी मागणी करण्यासाठी अर्ज केले होते त्यांना गृह मतदान करता येणार आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जुन्नर विधानसभा मतदारसंघाअंतर्गत चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकात एक मतदान अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक, व्हिडीओग्राफर, पोलीस कर्मचारी यांचा समावेश आहे.

गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे जुन्नर तहसील कार्यालयात 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 ते 1 या वेळेत प्रशिक्षण घेण्यात येणार असून निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती घाटगे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनिल शेळके, सचिन सुर्यवंशी, पोस्टल नोडल अधिकारी गणेश भोसले आदी मार्गदर्शन करणार असल्याचेही निवडणूक प्रशासनाने कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments