गुरूग्राम, भारत – जानेवारी १५, २०२४ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रॅण्डने ग्राहकांना प्रिमिअम, ५५-इंच व त्यावरील मोठ्या आकाराचे टेलिव्हिजन्स जसे निओ क्यूएलईडी ४के व ८के, ओएलईडी, क्यूएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टेलिव्हजन्सवर आकर्षक ऑफर्स व आकर्षक कॅशबॅक्स प्रदान करण्यासाठी ‘फ्यूचर फेस्ट’ची घोषणा केली. ‘द फ्यूचर फेस्ट’ ग्राहकांसाठी डॉल्बी अॅटमॉस, न्यूरल एआय क्वॉन्टम प्रोसेसर आणि एआय अपस्केलिंगसह भावी सिनेमॅटिक ऑडिओ-व्हिज्युअल अनुभवाला अपग्रेड करण्याची उत्तम संधी देते, तसेच यंदा प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक डील्स देखील देते.
३१ जानेवारी २०२४ पर्यंत ग्राहक मोठ्या स्क्रिन आकाराच्या टेलिव्हिजन्सच्या खरेदीवर खात्रीदायी मोफत गिफ्ट्स मिळवू शकतात, जसे १२४९९९ रूपये किंमत असलेला गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा (१२/२५६ जीबी व्हेरिएण्ट), ६९९९० रूपये किंमत असलेला ५०-इंच क्यूएलईडी ४के द सेरिफ टीव्ही आणि जवळपास ३७९९० रूपये किंमत असलेले वायरलेस साऊंडबार्स.
सॅमसंग ९८-इंच निओ क्यूएलईडी ४के आणि क्यूएलईडी ४के टेलिव्हिजन्स खरेदी करणाऱ्या ग्राहकांना ऑफर कालावधीदरम्यान १२४९९९ रूपये किंमत असलेला फ्लॅगशिप गॅलॅक्सी एस२३ अल्ट्रा स्मार्टफोन मिळेल.
निवडक ५०-इंच व त्यावरील आकाराच्या निओ क्यूएलईडी, ओएलईडी, क्यूएलईडी आणि क्रिस्टल ४के यूएचडी टेलिव्हिजन्ससह ग्राहकांना ३७९९० रूपयांचा सॅमसंग क्यू सिरीज साऊंडबार मिळेल, ज्यामुळे अद्वितीय पिक्चर क्वॉलिटीसह सर्वोत्तम ऑडिओ अनुभव मिळेल.
निवडक सॅमसंग ८५-इंच व ७५-इंच निओ क्यूएलईडी टेलिव्हिजन्सच्या खरेदीवर ग्राहकांना ६९,९९० रूपये किंमत असलेला सॅमसंग ५०-इंच क्यूएलईडी ४के द सेरिफ टीव्ही मोफत मिळेल. ही मर्यादित कालावधी ऑफर तुम्हाला एकाच किमतीमध्ये दोन अविश्वसनीय टेलिव्हिजन्स प्रदान करते. निवडक सॅमसंग ६५ व ५५ इंच ओएलईडी आणि क्यूएलईडी ४के टेलिव्हिजन्सच्या खरेदीवर ग्राहकांना १५९९० रूपये किंमत असलेला सॅमसंग साऊंडबार मोफत मिळेल.
”सॅमसंगचा फ्यूचर फेस्ट नाविन्यता आणि ग्राहकांना होम एंटरटेन्मेंटमध्ये आधुनिक एआय-समर्थित सुधारणा प्रदान करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला साजरा करतो. आमचे प्रिमिअम टेलिव्हिजन्स उल्लेखनीय पिक्चर, साऊंड क्वॉलिटी व आकर्षक डिझाइन्स देतात, तसेच वापरकर्त्यांच्या घरांमध्ये खास आकर्षण बनण्यासह हायपर-कनेक्टेड अनुभव देतात. फ्यूचर फेस्ट डील्स ग्राहकांना त्यांच्या टेलिव्हिजन्सना फ्यूचर-रेडी उत्पादनांमध्ये अपग्रेड करण्याची संधी देतात,” असे सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहनदीप सिंग म्हणाले.
निओ क्यूएलईडी ८के आणि ४के टेलिव्हिजन्स
सर्वोत्तम निओ क्यूएलईडी टीव्ही श्रेणी टीव्हीपेक्षा अधिक उत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. परिपूर्ण व्युईंग अनुभव देण्याव्यतिरिक्त्त हे टीव्ही सर्वोत्तम गेमिंग स्क्रिन बनू शकतात, तुमच्या घरामधील खास आकर्षण बनू शकतात किंवा इतर डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्मार्ट हब देखील बनू शकतात. निओ क्यूएलईडी टीव्हींमध्ये नियमित एलईडींपेक्षा ४० पट लहान असलेल्या क्वॉन्टम मिनी एलईडींची शक्ती असलेली क्वॉन्टम मॅट्रिक्स टेक्नॉलॉजी आहे. यामुळे सुस्पष्ट पिक्चर आणि उत्तम रंगसंगतींची खात्री मिळते. या टीव्हींमध्ये अद्वितीय ३डी सराऊंड साऊंड होम थिएटर अनुभवासाठी क्यू-सिम्फोनी ३.० असलेले डॉल्बी अॅटमॉस आणि ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड प्रो (ओटीएस प्रो) देखील आहे. या टेलिव्हिजन्समध्ये बिल्ट-इन आयओटी हब आहे, जे तुम्हाला सर्व स्मार्ट डिवाईसेसवर नियंत्रण ठेवण्याची सुविधा देते. स्लिमफिट कॅमेरासह तुम्ही टीव्हीमधून व्हिडिओ कॉल्स देखील करू शकता.
ओएलईडी टीव्ही
आकर्षक ओएलईडी टीव्हीमध्ये अल्टिमेट मनोरंजन अनुभवासाठी न्यूरल क्वॉन्टम प्रोसेसर ४के आहे, जे अविश्वसनीय सुस्पष्टता आणि स्क्रिन ब्राइटनेस देते. यामुळे मूळ पातळी कोणतीही असो स्क्रिनवर दिसणारे कन्टेन्ट आपोआपपणे उल्लेखनीय शार्प ४के रिझॉल्यूशनमध्ये बदलते. प्रोसेसर एआय-आधारित अल्गोदिरम्सचा वापर करत स्क्रिन-बाय-स्क्रिन आधारावर कन्टेन्टचे मूल्यांकन करते आणि एचडीआर ओएलईडी+ प्रत्येक फ्रेम ऑटिमाइज करते, ज्यामुळे तुम्हाला असाधारण सुस्पष्टतेसह मनोरंजनाचा आनंद घेता येऊ शकतो.
सॅमसंग क्यूएलईडी टेलिव्हिजन्स
सॅमसंगचा क्यूएलईडी टीव्ही प्रिमिअम टेलिव्हिजन्स व कौटुंबिक मनोरंजनाचा स्तर उंचावतो. या टीव्हीमध्ये आकर्षक डिझाइनला साजेशी अशी सर्वात प्रगत पिक्चर क्वॉलिटी आहे. यामधील क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञान टीव्हीची ब्राइटनेस पातळी वाढवते आणि प्रखर व सुस्पष्ट रंगसंगतींची निर्मिती करत निर्मात्यांना अपेक्षित असे प्रेक्षकांना उत्तम व्हिज्युअल अनुभव देते. क्यूएलईडी टीव्हींमध्ये ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड (ओटीएस) आणि अॅक्टिव्ह वॉईस अॅम्प्लीफायर (एव्हीए) देखील आहे, ज्यामधून घरामध्येच अद्वितीय सिनेमॅटिक अनुभवाची खात्री मिळते.
तुम्ही व्हिडिओ कॉल्स करण्यासाठी क्यूएलईडी टीव्हीशी स्लिमफिट कॅमेरा जोडू शकता. डोळ्यांना त्रास न देणारे आयकम्फर्ट मोड आपोआपपणे स्क्रिनचा ब्राइटनेस आणि बिल्ट-इन सेन्सर्सवर आधारित टोन समायोजित करतो. ‘१०० परसेंट कलर व्हॉल्यूम’ देत क्यूएलईडी टीव्ही ब्राइटनेसच्या पातळ्या न पाहता डीसीआय-पी३ कलर स्पेसचे सर्व रंग दाखवतो. यामधून एचडीआर इमेजेस् निर्मात्यांना अपेक्षित असलेल्या स्वरूपात प्रेक्षकांना पाहायला मिळते.
क्रिस्टल ४के यूएचडी टेलिव्हिजन्स
सॅमसंगचे क्रिस्टल ४के आयस्मार्ट यूएचडी टेलिव्हिजन्स विशिष्ट वैशिष्ट्यांसह प्रिमिअम अनुभवाची खात्री देतात. क्रिस्टल तंत्रज्ञानावर चालणारे हे टेलिव्हिजन्स उच्च दर्जाची रंगसंगती, अद्वितीय शार्पनेस व कॉन्ट्रास्ट पातळ्या देतात. क्रिस्टल ४के डिस्प्ले, व्हिडिओ कॉलिंग, स्मार्ट आयओटी हब, अॅडप्टिव्ह साऊंड, टॅप व्ह्यू, स्क्रिन मिररिंग आणि लॅग फ्री गेमिंग अशी अनेक वैशिष्ट्ये असलेले हे टेलिव्हिजन्स ग्राहकांना उत्तम पिक्चर क्वॉलिटी व उच्च दर्जाच्या कन्
टेन्ट वापराचा आनंद देतात.


