Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅन्टोन्मेंट मतदार संघात नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना दोन दिवसीय प्रशिक्षण

कॅन्टोन्मेंट मतदार संघात नियुक्त अधिकारी- कर्मचाऱ्यांना दोन दिवसीय प्रशिक्षण

**

पुणे,दि. १२ : पुणे कॅन्टोन्मेंट (अ.जा.) विधानसभा मतदारसंघात निवडणूकीसाठी नियुक्त १ हजार ९९० अधिकारी, कर्मचाऱ्यांना अबेदा इनामदार ज्युनिअर आणि सिनिअर कॉलेज, आझम कॅम्पस, पुणे येथे दुस-या टप्प्यातील दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुनंदा भोसले व मतदान व्यवस्थापन कक्षाचे नोडल अधिकारी बाळकृष्ण वाटेकर उपस्थित होते.

प्रशिक्षणात ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट मशीन, बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट घेवून केंद्राध्यक्ष व इतर सहायक अधिकारी मतदान केंद्रावर पोहोचल्यावर मतदान केंद्र मतदानासाठी कसे तयार करावे, इ.व्ही.एम. मशीन कमिशनिंगच्या पूर्ण प्रक्रियेविषयी संपूर्ण व सखोल माहिती देण्यात आली. निवडणुकीच्या दिवशी मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल कोणत्या पद्धतीने व कसा घ्यावा व त्यानंतर मशीन क्लिअर करून, सिलिंग कसे करावे याबाबत मतदान केंद्र अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष मशीन हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या दिवशी ८५७ प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.

श्री. वाटेकर यांनी मतदान यंत्राबाबत अत्यंत सोप्या भाषेत माहिती दिली व प्रात्यक्षिक दाखवले. प्रशिक्षणा दरम्यान प्रत्येक मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी मतदान यंत्रे स्वतः हाताळली व त्या संबंधीची सर्व माहिती प्रात्यक्षिकांच्या आधारे करून घेतली.

000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments