Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयआरडीएआयच्या कॉर्पोरेट एजन्सी लायसन्सचा जास्तीतजास्त उपयोग करण्यासाठी विमा प्लॅटफॉर्म विकसित करण्याची केप्री...

आयआरडीएआयच्या कॉर्पोरेट एजन्सी लायसन्सचा जास्तीतजास्त उपयोग करण्यासाठी विमा प्लॅटफॉर्म विकसित करण्याची केप्री ग्लोबल कॅपिटलची योजना

केप्री ग्लोबल कॅपिटल लिमिटेडला (सीजीसीएल) भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणातर्फे (आयआरडीएआय), डिसेंबर 2023 मध्ये, आयुर्विमा, सामान्य विमा व आरोग्यविमा उत्पादनांचे वितरण करण्यासाठी, संयुक्त कॉर्पोरेट एजन्सी लायसेन्स प्राप्त झाले आहे.

 

 

 

विमा उत्पादने व सेवा ग्राहकांना पुरवण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची सीजीसीएलची योजना आहे. विमा उत्पादने देण्यासाठी डेटा अॅनालिटिक्स, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि ब्लॉकचेनचा वापर करण्याची कंपनी नियोजन करत आहे. ह्यामुळे सीजीसीएलला दाव्यांवरील प्रक्रिया व ग्राहक सहाय्य सेवा स्वयंचलित करण्याची क्षमता प्राप्त होईल. परिणामी, कामकाजाचा खर्च कमी होईल आणि ग्राहकांना अधिक समाधानकारक सेवा देता येईल. त्यामुळे विमा प्लॅटफॉर्मचे प्रमुख उद्दिष्ट विमाकर्त्यांची (इन्शुअरर) परिसंस्था तयार करणे हेच असेल. विमाकर्ते अधिक परडवण्याजोग्या दरात व ग्राहकांना अनुकूल मार्गांनी संरक्षण पुरवणे शक्य होईल. त्यामुळे ‘2047 सालापर्यंत सर्व भारतीयांना विमा संरक्षण’ पुरवण्याचे आयआरडीएआयचे उद्दिष्ट साध्य करण्यात कंपनी योगदान देऊ शकेल.

 

 

 

विम्याबाबत ग्राहककेंद्री दृष्टिकोन ठेवणे हे कंपनीचे मूलभूत तत्त्व आहे. सीजीसीएल वेबसाइट, अॅप व कॉल सेंटर ह्यांच्या माध्यमातून विमा उत्पादने व सेवांची विस्तृत श्रेणी पुरवणार आहे. शिवाय, प्लॅटफॉर्म ग्राहकांसाठी अनुकूल असे पेमेंट धोरण ठेवणार आहे. त्यामुळे ग्राहकांना डिजिटल वॉलेट्स, क्रेडिट कार्ड्स, नेट बँकिंग व डेबिट कार्ड्स अशा विविध मार्गांनी पैसे भरण्याची मुभा मिळेल.

 

 

 

तंत्रज्ञानकेंद्री धोरणाचा अवलंब करून आपल्या 270 हजार एवढ्या मोठ्या ग्राहकवर्गाला (सप्टेंबर’23मधील आकडेवारीनुसार) विमा उत्पादनांचे क्रॉस-सेलिंग करण्याचे उद्दिष्ट सीजीसीएलने ठेवले आहे. आर्थिक वर्ष’24च्या पहिल्या सहामाहीत (H1) सीजीसीएलने वितरित केलेल्या कर्जांची एकूण रक्कम 62 बिलियन रुपये होती तसेच कंपनीच्या सक्रिय ग्राहकांच्या संख्येत 107 हजारांची भर पडली. शिवाय, कंपनीने आपल्या सहयोगी बँकांमार्फत 39 हजार नवीन ग्राहकांना 44 बिलियन रुपयांचे कार कर्ज दिले. वेगाने वाढणाऱ्या ग्राहक संबंधांमुळे सीजीसीएलला विम्याची व्याप्ती सुधारण्याच्या दृष्टीने मोठा ग्राहकवर्ग प्राप्त होत आहे. त्यामुळे सीजीसीएलला फीद्वारे मिळणारे उत्पन्न वाढवण्यास आणि भागधारकांना अधिक चांगला मोबदला पुरवण्यास मदत होत आहे. आर्थिक वर्ष’25मध्ये विमा क्रॉस-सेलिंगच्या माध्यमातून 200 दशलक्ष रुपयांचे निव्वळ फीच्या स्वरूपातील उत्पन्न मिळणे कंपनीला अपे

क्षित आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments