Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपर्वती विधानसभा मतदारसंघात जेष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा*

पर्वती विधानसभा मतदारसंघात जेष्ठ नागरीक व दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा*

*

पुणे, दि. 13 : पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या 85 वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांच्या गृहमतदानासाठी पथकांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघांमध्ये 15 व 16 नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांना घरबसल्या मतदान करता येणार आहे. वय 85 वर्ष व त्याहून अधिक असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांगत्व असणाऱ्या ज्या मतदारांनी अशी मागणी करण्यासाठी अर्ज केले होते त्यांना गृह मतदान करता येणार आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी पर्वती विधानसभा मतदारसंघाअंतर्गत नोडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके नियुक्त करण्यात आली असून मतदारांनी या दिवशी घरातून मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहनही श्री. खैरनार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments