पिंपरी, दि. १४ नोव्हेंबर २०२४ :- थोर क्रांतिवीर व प्रखर देशभक्त लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेस शहर अभियंता मकरंद निकम यांच्या हस्ते तसेच त्यांच्या चिंचवड स्टेशन येथील पुतळ्यास उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने थोर क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी..
RELATED ARTICLES


