Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedटुरिझम ऑस्ट्रेलिया आणि एयर इंडियामध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी तीन वर्षांचा...

टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि एयर इंडियामध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी तीन वर्षांचा सामंजस्य करार

गुरुग्राम, १४ नोव्हेंबर २०२४ – टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि एयर इंडिया यांनी आज तीन वर्षांचा विपणन विषयक (मार्केटिंग) करार केला असून त्याअंतर्गत ऑस्ट्रेलियात येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. एयर इंडिया ऑस्ट्रेलियामध्ये आपले अस्तित्व विस्तारत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा करार करण्यात आला आहे.

सामंजस्य कराराअंतर्गत (एमओयू) टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि एयर इंडियाद्वारे एकत्रितपणे विविध प्रकारचे मार्केटिंग उपक्रम राबवून ऑस्ट्रेलियातील जागतिक दर्जाचे पर्यटन दर्शवले जाणार आहे.

टुरिझम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापकीय संचालक फिलिपा हॅरिसन म्हणाल्या, ‘गेल्या काही वर्षांत भारतातून ऑस्ट्रेलियामध्ये येणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे आम्हाला दिसून आले आहे आणि ही वाढ आणखी विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. टुरिझम ऑस्ट्रेलिया आणि एयर इंडिया यांच्यात झालेल्या करारानुसार आम्ही भारतीय पर्यटकांना ऑस्ट्रेलियात येण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे नवनवीन मार्ग अमलात आणणार आहोत. एयर इंडियाच्या मदतीने ऑस्ट्रेलियाचे हॉलिडे डेस्टिनेशन असे स्थान बळकट करण्याचे आमचे ध्येय आहे.’

टुरिझम ऑस्ट्रेलियाचे कार्यकारी व्यवस्थापक- पूर्व बाजारपेठ आणि विमानवाहतूक, अँड्र्यु हॉग म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक या असलेल्या भारतात मोठी क्षमता आहे. एयर इंडियासह भागिदारीत आम्ही ऑस्ट्रेलियाचे पर्यटन तसेच बिझनेस ट्रॅव्हलर्ससाठी महत्त्वाचे स्थान अधोरेखित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पर्यटकांच्या संख्येत शाश्वत विकास करण्यासाठी तसेच पर्यटनाचा अनुभव आणि दोन्ही देशांमधली कनेक्टिव्हिटी उंचावण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.’

एयर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक कॅम्पबेल विल्सन म्हणाले, ‘टुरिझम ऑस्ट्रेलियासह भागिदारी करून पर्यटकांना या ठिकाणचे पर्यटनाचे वैविध्यपूर्ण अनुभव उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. जगभरात नेटवर्कचा विस्तार करत असताना आम्ही ऑस्ट्रेलियातही आमचे अस्तित्व सर्वदूर पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत.’

एयर इंडियाद्वारे सध्या भारत व ऑस्ट्रेलियादरम्यान १७ साप्ताहिक नॉन- स्टॉप फ्लाइट्स चालवली जातात. या वर्षात ऑगस्ट २०२४ पर्यंत कंपनीने १७०,००० भारतीय प्रवाशांची वाहतूक केली असून बाजारपेठेत १८.५ टक्के हिस्सा मिळवला आहे. कंपनी भारत ते ऑस्ट्रेलियादरम्यानच्या सर्वात मोठ्या विमानवाहतूक कंपन्यांपैकी एक आहे.

.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments