पुणे, दि. १७: जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात असून या अभियानाअंतर्गत पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने १९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते सायं. ५ वाजेपर्यंत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे रक्तदान व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबीरात सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
0000


