Saturday, September 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedगुरु नानक देव यांच्या जयंती निमित्त मतदार जनजागृती अभियान

गुरु नानक देव यांच्या जयंती निमित्त मतदार जनजागृती अभियान

दि.१५ नोव्हेंबर २०२४ :- शिखांचे पहिले गुरु गुरु नानक देव यांच्या जयंती निमित्त आकुर्डी येथील गुराद्वारा येथे महापालिकेच्या वतीने मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आला. यावेळी उपस्थित भाविकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.

सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आज महापालिकेच्या स्वीप कक्षाच्या वतीने आकुर्डी येथील गृद्वारा येथे मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यावेळी मुख्य लिपिक देवेंद्र मोरे, किसन केंगले, अभिजित डोळस, विकास गायकांबळे, ओंकार जाधव यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मतदारांना मतदानाबाबत माहिती देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments