Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०२५ ने जाहीर केली १८ व्या आवृत्तीसाठी वक्त्यांची घोषणा

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०२५ ने जाहीर केली १८ व्या आवृत्तीसाठी वक्त्यांची घोषणा

जयपूर २१ नोव्हेंबर २०२४- भारतातील अग्रगण्य फेस्टिव्हल क्युरेटर आणि प्रॉडक्शन हाऊस असलेल्या टीमवर्क आर्ट्सने जयपूरमधील हॉटेल क्लार्क्स आमेर येथे ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान होणाऱ्या प्रतिष्ठित जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या बहुप्रतीक्षित १८व्या आवृत्तीसाठी वक्त्यांची पहिली यादी जाहीर केली. ‘पृथ्वीवरील सर्वात मोठे साहित्य प्रदर्शन’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवात पुन्हा एकदा लेखक, विचारवंत आणि वाचक एकत्र येणार असून, साहित्यातील परिवर्तनशील शक्ती आणि विविध संस्कृतींमधील लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
२०२५ मध्ये होणारा जगातील पुस्तकांचा आणि कल्पनांचा हा उत्सव म्हणजे भेदभाव कमी करणं, सहानुभूती निर्माण करणं, आणि मानवी अनुभवांची देवाणघेवाण यांचं महत्त्व अधोरेखित करेल. संपूर्ण महोत्सव हा शाश्वतेच्या मूल्यावर आधारित असून पर्यावरणाची विशेष काळजी घेण्यात येणार आहे. या महोत्सवात अनेक चर्चा, आणि अविस्मरणीय सादरीकरण होणार असून. या वर्षीचा कार्यक्रम सांस्कृतिक संपत्ती, अजोड साहित्य कलाकृती आणि हरित भविष्य यावर भर देणारा असेल. त्यामुळे हा साहित्याचा महोत्सव एकमेवाद्वितीय असेल.
भाषिक वैविध्य हा कायमच जयपूर लिटरेचल फेस्टिव्हलचा आत्मा असून वेगवेगळ्या भाषांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. यावर्षीच्या सत्रात हिंदी, बंगाली, राजस्थानी, कन्नड, तामिळ, तेलुगू ओडिया, संस्कृत. आसामी, मल्याळम. मराठी, पंजाबी, उर्दू या भाषेतील काम सादर केलं जाणार असून त्यावर चर्चासत्रं होतील. हे सत्र महोत्सवातील सर्वसमावेशकतेचं तसंच विविधतेचं आणि समृद्धीचं प्रतिबिंब असेल.
१८व्या साहित्य महोत्सवात जागतिक आणि भारतीय साहित्यिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांसोबत सादरीकरणांसाठी ३०० हून अधिक वक्ते सहभागी होतील. पाच वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये उपस्थितांना वैश्विक आणि वैविध्यपूर्ण चर्चांचा अनुभव घेण्याची संधी मिळेल.
पहिल्या वक्त्यांच्या यादीत अँड्रे असिमन, अनिरुद्ध कनिसेट्टी, अ‍ॅना फंडर, अश्वनी कुमार, कावेरी मधवन, क्लॉडिया डी रॅम, डेव्हिड निकोल्स, फिओना कर्नार्वॉन, इरा मुखोटी, आयरेनोसेन ओकोजी, जेनी अर्पेनबेक, जॉन व्हायलेन्ट, कल्लोल भट्टाचार्य, मैथ्री विक्रमसिंघे, मानव कौल, मिरियम मार्गोलीज, नसीम निकोलस तालेब, नाथन थ्रॉल, प्रयाग अकबर, प्रियंका मट्टू, स्टीफन ग्रीनब्लॅट, टीना ब्राउन, व्ही. व्ही. गणेशनांथन, वेंकी रामकृष्णन, आणि यारोस्लाव ट्रोफिमोव यांचा समावेश आहे.
या सत्रांमध्ये वैचारिक, प्रेरणादायक आणि विविध प्रकारच्या चर्चांचा आस्वाद घेता येईल.

महोत्सवामागच्या महत्त्वाच्या व्यक्ती:
प्रसिद्ध लेखिका आणि महोत्सवाच्या सहनिदेशिका नामिता गोखले म्हणाल्या:
“जयपूर साहित्य महोत्सवात कायमच कथा, विचार आणि संस्कृती यांचा संगम बघायला मिळतो. आमच्या १८व्या आवृत्तीच्या तयारीदरम्यान, आम्ही साहित्याची प्रेरणा देणाऱ्या, आव्हान देणाऱ्या आणि लोकांना एकत्र आणत आहोत.यावर्षी आम्ही लेखक, कवी आणि विचारवंतांचा एक प्रज्ञावंत गट आपली उपस्थिती नोंदवणार आहे. ते आपल्या प्रेक्षकांशी संस्मरणीय संवाद साधतील आणि लिखित शब्दांवरच्या प्रेमाला आणखी चालना देतील. ”
प्रसिद्ध इतिहासकार, लेखक आणि महोत्सवाचे सहनिदेशक विल्यम डॅलरिंपल म्हणाले:
“जयपूर साहित्य महोत्सवात नेहमीच शब्दांचा उत्सव, विविधांगी आवाजांचा संगम दिसतो तसंच प्रेरणादायी, लोकांना जोडणाऱ्या कथांचा मिलाफ आहे.या वर्षी, जेव्हा आपण पुन्हा पिंक सिटीत भेटू तेव्हा जगभरातून आलेल्या उत्तुंग लेखक, विचारवंत आणि स्वप्नाळू लोकांतं स्वागत करण्यास आम्ही उत्सुक आहोत. विचारांना वाव देणारा, संस्कृतीचं मिलन करणारा आणि संवाद फुलवणारा हा खऱ्या अर्थाने सर्वांसाठीचा खराखुरा साहित्याचा सोहळा आहे.”
टीमवर्क आर्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक संजॉय के. रॉय म्हणतात,
“जयपूर साहित्य महोत्सव संस्कृती, सर्जनशीलता आणि भागीदारी या तीन मूल्यांशी साधर्म्य साधणारा जागतिक ब्रँड झाला आहे. हा प्रभाव वाढवण्याचं उद्दिष्ट आम्ही यावर्षी ठेवलं आहे. हा फक्त साहित्याचा उत्सव नाही तर कथाकथनासाठीचं उत्तम व्यासपीठ आहे. जभरातील प्रेक्षकांना ते आपलंसं वाटतं आणि त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळतो. हा महोत्सव भागीदार, प्रायोजक आणि हितचिंतकांना विविध प्रेक्षकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. त्यामुळे अर्थपूर्ण संवाद साधता येतात आणि जागतिक पातळीवर रीच वाढते. हा फक्त एक महोत्सव नसून एक चळवळ आहे. त्यामुळे अनेक संस्कृती एकत्र येतात आणि नवनवीन कल्पनांना वाव मिळतो.

जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०२५ ची ठळक वैशिष्ट्यं
जयपूर बूकमार्क- सर्जनशीलता आणि व्यवसाय यांचा मिलाफ
११व्या वर्षात पदार्पण करताना जयपूर बुकमार्कने (JBM) साहित्य क्षेत्रासाठी एक प्रमुख बी२बी नेटवर्किंग व्यासपीठ म्हणून आपली ओळख कायम ठेवली आहे. प्रकाशक, लेखक, साहित्य एजंट्स आणि या क्षेत्रातील दिग्गजांसाठी असलेले या केंद्रामुळे नावीन्यपूर्णता, भागीदारी आणि नवीन संधी मिळतात. महोत्सवाच्या व्यावसायिक अंगाच्या रूपात जेबीएम ही अशी जागा आहे जिथे सर्जनशील कल्पना प्रभावी जागतिक प्रकल्पांमध्ये रूपांतरित होतात.

पारंपरिक संध्याकाळ आणि जयपूर म्यूझिक स्टेज
साहित्यापलीकडे जाऊन या महोत्सवात कला आणि संस्कृतीचाही उत्सव साजरा केला जातो. जयपूरच्या ऐतिहासिक वातावरणात संध्याकाळच्या वेळी राजस्थानच्या समृद्ध परंपरेचं दर्शन होतं. जयपूर म्यूझिक स्टेज हा कार्यक्रम साहित्य महोत्सवाच्या समांतर सुरू असतो. त्यात सुप्रसिद्ध भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलाकार त्यांची कला सादर करतात आणि महोत्सवात रंग भरतात.

जागतिक पातळीवरच्या विचारवंताचे व्यासपीठ
जगातील सर्वात लोकप्रिय साहित्य संमेलन म्हणून जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्वसमावेशकतेचा पुरस्कार करणारं, लोकशाही, असंलग्न व्यासपीठ म्हणून आपलं स्थान कायम ठेवलं आहे. दरवर्षी, सद्यपरिस्थितीला आव्हान देणारे, नावीन्यपूर्णतेस प्रेरणा देणारे आणि विविधतेचा उत्सव साजरे करणारे लोक एकत्र येतात आणि बौद्धिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण करतात.
जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल २०२५ हा केवळ एक कार्यक्रम नाही; हा विचारांचा, संस्कृतींचा आणि कथाकथनावरील सार्वत्रिक प्रेमाचा उत्सव आहे. तुम्ही उत्तम वाचक असाल, नवोदित लेखक असाल किंवा तुम्हाला गप्पा मारायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे.

या महोत्सवाविषयी अधिक माहितीसाठी https://jaipurliteraturefestival.org/ ला भेट द्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments