Friday, September 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedकालातीत संबंधांची खरी जादू

कालातीत संबंधांची खरी जादू

१३८ वर्षांहून अधिक काळापासून कोका-कोला भौगोलिक क्षेत्रांतील व पिढ्यानपिढ्या व्‍यक्‍तींना एकत्र करत आनंद व रिफ्रेशमेंटची प्रतीक राहिली आहे. १९९३ मध्‍ये भारतात स्‍थापना झाल्‍यापासून कंपनीचा अद्वितीय रेड-अँड-व्‍हाइट लोगो व्‍यक्‍तींच्‍या दैनंदिन जीवनाचा आणि आयकॉनिक क्षणांचा भाग राहिला आहे. क्रिकेट चीअर्सपासून संगीतमय पर्वणी ते दैनंदिन आनंदापर्यंत कोका-कोलाने भारतात स्‍वत:चे स्‍थान निर्माण केले आहे, तसेच देशभरातील सेलिब्रेशन्‍सचा भाग बनली आहे.

सणासुदीच्‍या काळातील सेलिब्रेशनची कल्‍पना करा, जेथे सर्वत्र प्रकाश व आनंदाचे वातावरण असते किंवा क्रिकेट सामना, जेथे प्रत्‍येक चीअरनंतर कोक बॉटल उघडण्‍याचा क्‍लासिक आवाज ऐकायला येतो. आता विवाह सोहळ्याची कल्‍पना करा, जेथे थंडगार कॉन्‍चर बॉटल या समारोहाचा भाग बनली आहे. आणि आणखी एक बाब म्‍हणजे, कॉलेज मित्रांचा ग्रुप कॉलेज कॅन्‍टीनमध्‍ये कोका-कोलाचा आस्‍वाद घेत गप्‍पागोष्‍टी करत आहेत. या फक्‍त आठवणी नाहीत तर अनुभव आहेत, असे क्षण ज्‍यांनी रिफ्रेशमेंटप्रती परस्‍पर प्रेमामधून भारतातील संपन्‍न विविधता, संस्‍कृती आणि लोकांसोबतच्‍या कोका-कोलाच्‍या नात्‍याला आकार दिला आहे.

कोका-कोलाच्‍या आयकॉनिक पोर्टफोलिओने या नात्‍याला अधिक दृढ केले आहे, जो ग्राहकांच्या विविध गरजांची पूर्तता करण्‍यासाठी पर्याय देतो. क्‍लासिक ऑफरिंगपासून समकालीन पर्याय जसे कोक झीरो व डाएट कोकपर्यंत ब्रँड प्रत्‍येकासाठी काही-ना-काही देते. रिफ्रेशमेंट व्‍यतिरिक्‍त कोक स्‍टुडिओ भारत व कोक स्‍टुडिओ तमिळ अशा उपक्रमांच्‍या माध्‍यमातून कोका-कोला भारताच्‍या सांस्‍कृतिक संपन्‍नतेला साजरे करते, देशातील विविध प्रांतांमधील गाथा व संगीताला प्रकाशझोतात आणते. दिलजीत दोसांझ सारख्‍या आर्टिस्‍ट्ससोबतचा सहयोग ब्रँडला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या सर्वसमावेशकता आणि सर्जनशीलतेच्‍या उत्‍साहाला अधिक दृढ करतो.

”तीन दशकांपासून कोका-कोला भारताच्‍या परिवर्तनात्‍मक विकासाच्‍या प्रवासाची आणि आपल्‍या संपन्‍न विविधतेच्‍या सेलिब्रेशनची अभिमानी सोबती राहिली आहे. आम्‍ही नेहमी एकतेच्‍या क्षणांना उत्‍साहित करत भारतीयांसोबत सखोल नाते निर्माण करण्‍याचा नेहमी प्रयत्‍न केला आहे. दुपारचे तप्‍त वातावरण असो किंवा मित्रांसोबत स्‍वादिष्‍ट फूडचा आस्‍वाद घ्‍यायचा असो किंवा कुटुंबासोबत एकत्र सुट्टीची धमाल करायची असो थंडगार कोकच्‍या बॉटल्‍स नेहमी सोबत असतात. आम्‍ही प्रियजनांसोबत कनेक्‍ट होण्‍याच्‍या क्षणांमधून खरा जीवनाचा आनंद मिळतो या संकल्‍पनेशी कटिबद्ध आहोत,” असे कोका-कोला कंपनीच्‍या इंडिया व साऊथवेस्‍ट एशिया ऑपरेटिंग युनिट येथील कोका-कोला श्रेणीसाठी मार्केटिंगचे वरिष्‍ठ संचालक कौशिक प्रसाद म्‍हणाले.

भारतीय उत्‍साहवर्धक क्षणांचा आनंद घेण्‍यास उत्‍सुक असण्‍यासोबत रिफ्रेशमेंट आणि अर्थपूर्ण क्षणांसाठी मागणी वाढत जाईल. कोका-कोला या प्रवासामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, तसेच या क्षणांमधील ‘रिअल मॅजिक’वर विश्‍वास आहे आणि मार्वल मॅश-अप सारख्‍या जागतिक सहयोगांच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यतेचा अवलंब करत आहे. कोका-कोला महत्त्वपूर्ण क्षणांचा भाग असण्‍याप्रती समर्पित आहे – एक बॉटल, एक कनेक्‍शन आणि एका वेळी एक सेलिब्रेशन.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments