*
*पुणे दिनांक ३० नोव्हेंबर २०२४*
*महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण वीज बिल मुक्तीच्या प्रचंड यशानंतर शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ महाराष्ट्र राज्य, अत्ता शेतकऱ्यांचे सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती साठी ३० डिसेंबर २०२४ पासून राज्य व देश व्यापी शेतकरी संवाद यात्रा आंदोलन सुरू करणार असून या शेतकरी संवाद आंदोलनात राज्य व राष्ट्रीय पातळीवरील २६ विविध संघटना सहभागी होणार असल्याची माहिती दिनांक २९ नोव्हेंबर रोजी संघटनेच्या झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये विठ्ठल राजे पवार यांनी दिली.
*संघटनेने अनेक महत्त्वाच्या मागण्या राज्य व केंद्र सरकारकडे केलेले आहेत त्याबाबतचा पाठपुरावा देखील संघटनेने केलेला आहे यामध्ये सर्वात प्रथम महत्त्वाची मागणी म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती त्यानंतर शेतमालाला गॅरंटी बेसरेट हमीभाव जाहीर करावा त्यामध्ये संघटनेने मुंबई उच्च न्यायालय व राज्य अन्न आयोगाकडून मिळवलेल्या आदेशाची पूर्तता राज्य सरकारने करून स्वतः शासन आदेश जाहीर करावा त्यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना गायीच्या दुधाला राज्य सरकारने किमान ४८/- रुपये प्रति लिटर बेस रेट दर तर म्हशीच्या दुधाला ५८ रुपये प्रति लिटर बेस रेट दर जाहीर करावा. कांद्याला किमान २४१० प्रति क्विंटल बेस रेट, सोयाबीनला किमान ९५०० बेस रेट तर कापसाला किमान १२५०० प्रतिक्विंटल बेस रेट त्याचप्रमाणे सर्व प्रकारचा भाजीपाला किमान दहा रुपयाला गड्डी किंवा पेंडी तसेच इतर फळ भाजीपाल्यांना किमान २५/- रुपये प्रति किलो, 55 वर्षांवरील शेतकऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन तसेच ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या मुला मुलींना मोफत शिक्षण गाव स्मार्ट स्मार्ट व्हिलेज योजना जाहीर करून गावाकडे सर्व गावांमध्ये आरोग्य मंदिर व शिक्षण मंदिर उभारून मुलांना मोफत शिक्षण तसेच मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी तसे आदेश राज्य शासनाने जाहीर करावेत यासाठी व अन्य विविध मागण्यांसाठी संघटना २८ आणि २९ डिसेंबर रोजी पुणे येथे शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महासंघ व एनयूबीसीच्या माध्यमातून राज्यव्यापी अधिवेशन बोलवलेले असून ३० डिसेंबर:२०२४ पासून राज्य व देशव्यापी शेतकरी संवाद यात्रा काढणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आला तशा आशयाचे पत्र राज्य व केंद्र सरकारला दिले असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार यांनी आजच्या बैठकीमध्ये दिली.
*यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे प्रदेश सचिव डॉक्टर गजेंद्र पाटील यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे या बैठकीला संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार, संघटनेचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉक्टर रमेश पाटील, उपसचिव काशिनाथ जाधव, संघटनेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख श्री भाग्यवंत नायकुडे तसेच संघटनेचे वरिष्ठ नेते नगर नाशिक सहकार विभागाचे अध्यक्ष जगन्नाथ कोरडे पाटील, नगर जिल्हा अध्यक्ष दौलत गनगे पाटील, एडवोकेट रवींद्र पागीरे, एडवोकेट सतीश शिंगडे पाटील, संघटनेचे प्रदेश विद्यार्थी युवक आघाडीचे अध्यक्ष रविराणा उर्फ राणाप्रेमजीतसिंह राजे पवार, पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब वर्पे, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अनिल भांडवलकर, सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत नलावडे, युवकाध्यक्ष महेश बिस्कीटे, सागर शितोळे, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष गणपती यादव, उपाध्यक्ष जाधव, जालना जिल्ह्याचे अध्यक्ष योगेश कदम, मराठवाडा प्रसिद्ध प्रमुख प्रदीप दिव्यवीर, मुंबई विभागाचे अध्यक्ष निवृत्ती भराटे महिला अध्यक्ष सुषमा राठोड, महिला युवा विद्यार्थी वकील आघाडी प्रदेश अध्यक्षा एडवोकेट शारदा राजे जाधव, प्रदेश उपाध्यक्ष कीर्ती पुजारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.