…….
कंपनीच्या भारतातील विक्रीस सुरुवात झाल्यापासून आजवर पाच लाखांपेक्षाही अधिक वाहनांची विक्री
नोव्हेंबर 2024 मध्ये घाऊक मासिक 9040 वाहनांची विक्री नोंदवली
निर्यातीत वार्षिक 222 टक्क्यांची वाढ आणि एमओएममध्ये 173.5 टक्क्यांची वाढ
…….
गुरुग्राम, 3 डिसेंबर 2024: ‘निसान मोटर’ने देशांतर्गत एकूण पाच लाख मोटरविक्रीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला असून कंपनीच्या भारतातील विक्रीस सुरुवात झाल्यापासून आजवर तब्बल 5,13,241 वाहनांची विक्री झाली असल्याची घोषणा, ‘निसान मोटर, इंडिया’कडून करण्यात आली. त्याचप्रमाणे, कंपनीकडे ‘न्यू निसान मॅग्नाइट एसयूव्ही’सह अन्य वाहनांचीही सातत्याने मागणी येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीने चालू वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात एकूण 9040 वाहनांची घाऊक विक्री नोंदवली आहे. देशांतर्गत विक्री 2342 नोंदवली गेली, तर 6698 वाहनांची निर्यात नोंदवण्यात आली.
चालू वर्षीच्या म्हणजे 2024 च्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत एकूण एकत्रित घाऊक विक्रीमध्ये 5570 वाहनांवरून 9040 पर्यंत म्हणजे 63 टक्के (एमओएम) वाढ झाली आहे. निर्यातीमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने ही वाढ दिसून आली. 2024 च्या नोव्हेंबर महिन्यात निर्यातीत 2023 च्या नोव्हेंबरमधील 2081 वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत 222 टक्क्यांची (वायओवाय – आधीच्या वर्षीच्या तुलनेत)) वाढ झाली; तसेच 2024 च्या ऑक्टोबरमधील 2449 वाहनांच्या विक्रीच्या तुलनेत 173.5 टक्के (एमओएम) वाढ नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील निसानच्या वाढत्या विक्रीचे प्रतिबिंब या कामगिरीतून दिसून आले. त्याचप्रमाणे कंपनीच्या ‘मेड इन इंडिया’ वाहनांवरील ग्राहकांचा विश्वास वाढ असल्याचेही हे दर्शक आहे.
निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ वत्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘निसान मोटर इंडियाने देशांतर्गत विक्रीचा पाच लाखांचा ऐतिहासिक टप्पा पार करणे, ही सर्वांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या ग्राहकांनी वर्षानुवर्षे आमच्या वाहनांच्या दर्जा, विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेवर सातत्याने विश्वास ठेवल्याचे या उल्लेखनीय यशातून दिसून येते. निसान भारतातील कार्यपद्धती, डीलर, भागीदार आणि ग्राहकांप्रती कटीबद्ध आहे. या वर्षीच्या सुरुवातीस निसान एक्स-ट्रेल आणि न्यू निसान मॅग्नाइट या दोन वाहनांच्या योजना आम्ही जाहीर केल्या होत्या. त्या योजना लवकरच प्रत्यक्षात येतील.’
‘निसानच्या भारतीय बाजारपेठेशी असलेल्या दृढ संबंधांचा एक भाग म्हणून ग्राहकांच्या अधिकाधिक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आम्ही न्यू निसान मॅग्नाईट सादर करून आम्ही अलीकडेच आमच्या उत्पादनांचा विस्तार केला आहे. त्यामागे ‘वन कार, वन वर्ल्ड’ हे आमचे तत्त्वज्ञान आहे. न्यू निसान मॅग्नाईटच्या आगमनाने आमच्या निर्यातीत अभूतपूर्व वाढ झाली असून आमच्या उत्पादनक्षमतेचे दर्शन त्यातून घडते. यामुळेच आम्ही जागतिक दर्जाची उत्पादने जगभरात पोहोचवू शकतो,’ असेही वत्स यांनी पुढे सांगितले.
आंचरराष्ट्रीय बाजारपेठेत ‘मेड इन इंडिया’ मॅग्नाईटच्या वाढत्या मागणीमुळे निसानला 45 पेक्षाही अधिक देशांमध्ये आपल्या उद्योगाचा विस्तार करता आला. त्यामुळे कंपनीचा विस्तार आता एकूण 65 देशांमध्ये झाला असून त्यामध्ये ‘लेफ्ट हँड ड्राइव्ह’ देशांचाही समावेश आहे. या टप्प्यामुळे भारत हे निसानचे एक महत्त्वपूर्ण निर्यात केंद्र बनले आहे. कारच्या आतील व बाहेरील बोल्ड, स्टायलिश रचना हे न्यू निसान मॅग्नाईटचे वैशिष्ट्य आहे; तसेच 20 पेक्षा अधिक फर्स्ट आणि बेस्ट इन सेगमेंट वैशिष्ट्ये आणि एकूण 55 पेक्षा अधिक सुरक्षा वैशिष्ट्ये यांचाही समावेश आहे.
निसान मोटर इंडिया प्रा. लि. विषयी
निसान मोटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एनएमआयपीएल) ही कंपनी 2010 मध्ये स्थापन झाली असून ती निसान मोटर को. लि. जपानची शंभर टक्के उपकंपनी आहे. ही कंपनी चेन्नईमधील उत्पादन प्रकल्प आणि संशोधन व विकास (आर अँढ डी) केंद्रासह देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठांना सेवा देते. निसानने आपल्या जागतिक भादीदार असलेल्या रेनॉल्ट कंपनीशी 70,000 पेक्षा अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार व कौशल्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय बाजारपेठेत 1.8 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. अधिक माहिती www.nissan.in येथे मिळेल.
निसान’ने देशांतर्गत बाजारपेठेत पाच लाखांचा टप्पा ओलांडला नोव्हेंबर 2024 मध्ये एकूण 9040 वाहनांची विक्री
Share with
Tagged in :